आनंदी आनंद गडे
- उषा लोणी
- Sep 30
- 1 min read
आनंदी आनंद गडे वजन वाढते चोहीकडेवरती खाली मेद भरे वायुसंगे फॅट मुरे
उपाय सरले
व्यर्थच ठरले
तन भुल भुलले
मेद पसरतो चोहीकडे आंनदी आनंद गडे फुलली काया प्रेमाने काही न घडे योगाने
पळू लागले
डाएट केले
चहा सोडले
तरीही फरकच नाही पडे वजन वाढते चोहीकडेकाळजी लागली शरीराची भिती वाटली रोगाची
बर्गर, ब्रेड सोडले
पोळी भाजी खाल्ले
तशीच राहिले
पिझ्झाविना चैन ना पडे वजन वाढते चोहीकडेरोज रोज सकाळी वजन बघते वजनकाटा पुढे सरकते
धाप लागली
दमही लागला
देहच थकला
काय करावे पडले कोडे वजन वाढते चोहीकडेआनंदी आनंद गडे वजन वाढते चोहीकडेचटकदार रेसिपी! नक्की करून बघा.
उषा लोणी



Comments