संपादकीय
- राजेश सहस्रबुद्धे

- Sep 30
- 3 min read
ह्या त्रैमासिकातील कार्यक्रम आणि उपक्रम
ह्या त्रैमासिकाची सुरुवात झाली ती त्रिवेणी सदस्यांच्या Greater Cincinnati Water Works च्या water
treatment plant च्या भेटीने. हा एक वेगळा उपक्रम आपण 2024 साली सुरु केला. मागच्या वर्षीप्रमाणेच
ह्या वर्षी सुद्धा ह्या भेटीला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. 45 सदस्य ह्यात सहभागी झाले आणि त्यात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. Know Your Community हे उद्दिष्ट असलेला हा उपक्रम म्हणजे
सगळ्यांसाठीच शिकण्याची एक चांगली संधी होती. इरा रामचंद्रे हिने लिहिलेला ह्या भेटीवर आधारित लेख
ह्या अंकात अवश्य वाचावा.
'स्वास्थ्य' उपक्रमाअंतर्गत ह्या वर्षी CPR / AED प्रशिक्षणाचे 2 sessions आपण आयोजित केले. 21
सभासदांनी ह्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन त्यांना certificates मिळाली. आपत्कालीन परिस्थितीत गरजूंना
मदत करण्याची एक मोठी जबाबदारी ह्या सदस्यांनी घेतली आहे ह्या बद्दल त्यांचे अभिनंदन करावेसे वाटते.
विशेष म्हणजे ह्या उपक्रमात सुद्धा विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.
गणेश उत्सव हा आपला वर्षातला सगळ्यात मोठा कार्यक्रम असतो. दरवर्षी प्रमाणेच ह्या ही वर्षी जवळ जवळ 1,000 लोकांनी ह्या कार्यक्रमात ह्यात भाग घेतला. ढोल ताशाच्या दणदणाटाने आसमंत गर्जून गेला आणि सुरेल भजन गायनाने सगळेच गणरायाच्या भक्तीत मग्न झाले. ह्या दोन्ही कार्यक्रमात आपल्या युवक विद्यार्थ्यांचा खूपच उत्साही सहभाग होता.
कार्यकारी समिती सदस्य म्हणून गेली 2 वर्षं काम केल्यावर आणि आपले सगळे कार्यक्रम आणि उपक्रम तसेच BMM चे द्विवार्षिक तसेच Cleveland येथील regional संमेलन बघितल्यावर एक बाब प्रकर्षाने लक्षात आली ती म्हणजे आपल्या युवक विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सहभागाची तीव्र इच्छा. ह्या उत्साहाला योग्य मार्गदर्शन करून त्यांना त्रिवेणीच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणावर सामील करून घेण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.
ह्या त्रैमासिकातला आपला शेवटचा कार्यक्रम म्हणजे स्वरसंध्या. त्रिवेणी परिवारातील अतिशय गुणवंत गायक वादकांनी सजवलेला हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. जवळ जवळ 100 लोकांनी ह्याचा आनंद घेतला. Evendale Cultural Arts Center च्या छोट्याशा पण अतिशय सुंदर सभागृहात हा कार्यक्रम झाला.
आगामी कार्यक्रम
वर्षाच्या शेवटच्या त्रैमासिकातले आगामी कार्यक्रम नेहमीच उत्कंठावर्धक असतात. त्यात ह्या वर्षी भर पडली आहे ती अतिशय लोकप्रिय कलाकार प्रशांत दामले ह्यांच्या "शिकायला गेलो एक" ह्या पारितोषिक विजेत्या धमाल विनोदी नाटकाची. 14 ऑक्टोबर (मंगळवार) रोजी Miami University च्या David Finkleman Auditorium येथे ह्या नाटकाचे आयोजन केले आहे. तिकिटं आपल्या website वर उपलब्ध आहेत (https://www.triveni-mandal.org/event-details/sikayala-gelo-eka). कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. पंचक्रोशीतल्या Columbus OH , Columbus IN , Louisville , Indianapolis इथूनही लोक कार्यक्रमाला येणार आहेत. तिकिटं घेतली नसल्यास लवकरात लवकर घ्यावीत जेणेकरून आपल्याला मनाजोगत्या seats आरक्षित करता येतील.
ह्या आधी 9 ऑक्टोबर रोजी मंडळाची Annual General Meeting MMC च्या #1029 community
room मध्ये आयोजित केली आहे. AGM साठी आपली उपस्थिती नोंदवण्यासाठी website वर जाऊन
RSVP करू शकता (https://www.triveni-mandal.org/event-details/annual-general-meeting). आपला दिवाळीचा कार्यक्रम 1 नोव्हेंबर रोजी साजरा होईल. आपले कलाकार आणि कार्यकारी समिती दिवाळी साजरी करण्याच्या जोरदार तयारीला लागले आहेत. हा कार्यक्रम Milford High School च्या सुसज्ज आणि आधुनिक auditorium मध्ये आयोजित केला आहे.
सिनसिनाटीतील भारतीय समुदायाचे प्रतिबिंब - कार्यक्रम स्थळांचा वापर आपल्या विविध कार्यक्रमांसाठी सभागृह शोधणे ही दर वर्षीच कार्यकारी समितीची एक मोठीच जबाबदारी असते. आपल्या कार्यक्रमांच्या स्वरूपामुळे शाळांची सभागृह हा सगळ्यात उत्तम पर्याय असतो. गेल्या काही वर्षांच्या अनुभवावरून असे प्रकर्षाने लक्षात आले आहे की अनेक शाळा त्रिवेणी तसेच इतर भारतीय संस्थांना शाळा उपलब्ध करून देण्यास तयार नाहीत. ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे शाळांच्या परिसराचा अनुचित उपयोग.
आमच्या अनुभवावरून तसेच शाळांकडून मिळालेल्या अभिप्रायांवरून असे कळले की - rent न केलेल्या
जागांचा वापर करणे , त्या जागांमधील सामान अस्ताव्यस्त करून ठेवणे, स्टेज वर चिकटवलेल्या adhesive tapes तशाच ठेवणे, carpetted भागात सांडलेले खाद्य पदार्थ तसेच ठेवले जाणे ही प्रमुख करणे आहेत. ह्यातल्या काही घटना ह्या लहान मुलांकडुन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच बरोबर क्वचित प्रसंगी शाळेची इमारत आणि आजूबाजूच्या परिसरात धूम्रपान तसेच मद्यपानाचेही कारण देण्यात आले आहे.
कार्यक्रम स्थळे व्यवस्थित वापरण्यासाठीची योजना
अमेरिकेतला भारतीय समाज हा संपन्न आणि उच्च विद्या विभूषित असा आहे. आपल्याला वरील कारणांमुळे ओळखले जावे हे काही फार अभिमानाचे नाही. वरील उल्लेख केलेल्या सगळयाच घटना ह्या त्रिवेणीच्या कार्यक्रमांमध्ये झाल्या असतील असे नाही. तरीही सावधगिरी म्हणून आपणही जबाबदारी घ्यावी ह्या उद्देशाने कार्यकारी समितीने काही खबरदारी घेण्याचे योजले आहे. ह्या सगळ्यात आपल्या सहकार्याची खूप गरज आहे.
ह्या संबंधीच्या सूचना समिती कार्यक्रमांच्या आधी आणि दरम्यान जाहीर करेलच. त्यांची थोडक्यात माहिती
खालीलप्रमाणे :
● प्रेक्षागृहात (theater) मध्ये कुठल्याही प्रकारचे खाद्यपदार्थ नेले जाऊ नयेत. खाद्यपदार्थ फक्त ठराविक
जागेत (designated areas) न्यावेत आणि सेवन करावेत.
● शाळेच्या परिसरात धूम्रपान किंवा मद्यपान करण्यास सक्त मनाई.
● कार्यक्रमाचे दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक ह्यांनी कार्यक्रमानंतर स्टेज वरील सर्व सामान आणि adhesive
tapes काढण्याची खबरदारी घ्यावी.
● लहान मुलांवर पालकांनी लक्ष ठेवावे आणि ही मुलं फक्त प्रेक्षागृह (theater) आणि dining hall
सोडून इतर कुठल्याही भागात खेळत नाहीत, खास करून classrooms मध्ये, ह्याची खबरदारी
घ्यावी. धावणे, खुर्च्या किंवा स्टेजवर उड्या मारणे आणि कोणत्याही देखरेखीशिवाय खेळणे ह्यास सक्त
मनाई आहे. Parents’ supervision of their kids throughout the event is a must.
Community update
वरील विषयावर त्रिवेणी सोडून इतर भारतीय संस्थांमध्ये सुद्धा चर्चा सुरु आहेत. अनेक संस्था एकत्र येऊन
भारतीय संस्थांसाठी खास असे Indian Cultural Center उभारता येईल का, त्याचे स्वरूप आणि व्याप्ती काय असेल, खर्च किती येईल, जागेची उपलब्धता अशा अनेक व्यापक विषयांवर चर्चा होताहेत. अनेक मराठी लोक ह्यात विविध तऱ्हेने सहभाग घेत आहेत ही समाधानाची बाब आहे. सध्या ह्या चर्चांचे स्वरूप प्राथमिक असून पुढील काही महिन्यांमध्ये काही ठोस पावलं उचलण्याएवढी प्रगती होऊ शकेल अशी अशा वाटते.
समस्त त्रिवेणी परिवाराला आगामी दसरा आणि दिवाळीनिमित्त शुभेच्छा !


Comments