हरिचा... हरिचा ... हरिचा ... !!!
- Mar 31
- 1 min read
फुलाला सुगंध मातीचा, मातीला सुगंध घामाचा
घामाला सुगंध कष्टाचा, कष्टाला सुगंध मनाचा
मनाला सुगंध तो मनातल्या हरिचा ||
पर्वतांच्या पायी शिळा, शिळांच्या पायी खडक
त्या खडकांनी बांधिला सेतू, त्यात वाटा एका खारीचा
खारीवरून फिरे हात प्रेमळ, तो हातही होता हरिचा ||
तलम वस्त्र रेशमाचे, दैवलोकीच पांघरायचे
वस्त्रांस कड जरीचे, फाडून त्याची केली चिंधी
रक्ताळला जेंव्हा हात, तो तर होता हरिचा ||
उन्हा रानात दुखले पाय कोमल, जगाने सारिले दूर
पण ज्ञानशक्तिने वदविला रेडा, निर्मिली गिताई
उचलली लेखणी ज्या हाताने, तोही होता हरिचा ||
जमविले सवंगडी मानी ईमानी, खेळांचा सोडला नाद
बांधले तोरण हिंदत्वाचे, आली भवानी स्वप्नःत
तळपली तलवार ज्या हाती, तो हात होता हरिचा ||
नावेला दिशा सुकाणूची, सुकाणूला दिशा जलाची
जलाला दिशा वायूची अन् वायूला दिशा कोणाची ?
दिशा दाखवी हात, तो आपल्या मनातल्या हरिचा ||
हरिचा... हरिचा ... हरिचा ... !!!



Comments