महती त्रिवेणीची
- अनिरुद्ध गद्रे

- Jun 30
- 2 min read
रुजवू मराठी वाढवू मराठी
टिकवू मराठी रीती
रुजवू मराठी वाढवू मराठी
टिकवू मराठी रीती
सिनसिनाटी, डेटन आणि उत्तर केंटकी
मराठी हो आली येथे चार टाळकी
रुजवू मराठी वाढवू मराठी
टिकवू मराठी रीती
सिनसिनाटी, डेटन आणि उत्तर केंटकी
मराठी हो आली येथे चार टाळकी
रोवले हो निगुतीने संस्थेचे या बीज
संस्कृतीची रक्षा करी कलेचीही चीज
मराठी हा वारसा मी जपणार हाय
अहो सांगू माझ्या त्रिवेणीची महती मी काय
रुजवू मराठी वाढवू मराठी
टिकवू मराठी रीती
रुजवू मराठी वाढवू मराठी
टिकवू मराठी रीती
गुढी पाडवा, कोजागिरी, मकर संक्रांती
दिवाळीचा धमाका अन् बाप्पा गणपती
होई मकर संक्रांती येती बाप्पा गणपती
होई मकर संक्रांती येती बाप्पा गणपती
गुढी पाडवा, कोजागिरी, मकर संक्रांती
दिवाळीचा धमाका अन् बाप्पा गणपती
साजरे हो करू सण आपले मराठी
संस्कृती जतन होई होती भेटीगाठी
सणासुदीला मला हो मिरवायचं हाय
अहो सांगू माझ्या त्रिवेणीची महती मी काय
रुजवू मराठी वाढवू मराठी
टिकवू मराठी रीती
रुजवू मराठी वाढवू मराठी
टिकवू मराठी रीती
ढोल ताशा, लेझीम दिंडी, शाळा मराठी
सिने नाट्य गीत नृत्य पिकनिक ही होती
भरे शाळा मराठी इथे पिकनिक ही होती
भरे शाळा मराठी इथे पिकनिक ही होती
ढोल ताशा, लेझीम दिंडी, शाळा मराठी
सिने नाट्य गीत नृत्य पिकनिक ही होती
योगासने, 5k run, सेवा समाजाची
त्रिवेणीत नाही कमी उपक्रमांची
सर्वांगीण विकासाची संधीच ही होय
अहो सांगू माझ्या त्रिवेणीची महती मी काय
रुजवू मराठी वाढवू मराठी
टिकवू मराठी रीती
रुजवू मराठी वाढवू मराठी
टिकवू मराठी रीती
इवल्याशा रोपाचा हा वटवृक्ष झाला
रेशिमगाठ त्रिवेणी ही बांधी समाजाला
रुजवू मराठी वाढवू मराठी
टिकवू मराठी रीती
इवल्याशा रोपाचा हा वटवृक्ष झाला
रेशिमगाठ त्रिवेणी ही बांधी समाजाला
परंपरा जपू करू शिक्षण प्रसार
संवाद सहभाग जोडू स्वास्थ्य सुविचार
मराठी हा झेंडा कसा फडकत हाय
अहो सांगू माझ्या त्रिवेणीची महती मी काय
रुजवू मराठी वाढवू मराठी
टिकवू मराठी रीती
रुजवू मराठी वाढवू मराठी
टिकवू मराठी रीती





Comments