संपादकीय
- राजेश सहस्रबुद्धे

- Jun 30
- 3 min read
त्रिवेणी झळकली !
सर्वसाधारणपणे एप्रिल ते जून हा त्रिवेणी साठी lean period असतो. गुढी पाडव्याचा कार्यक्रम मार्च मध्ये किंवा अगदी एप्रिलच्या सुरुवातीला होऊन जातो आणि गणेश उत्सवाला भरपूर वेळ असतो. ह्या वेळेला सुद्धा पाडव्याचा एप्रिल च्या सुरुवातीलाच झाला पण कार्यक्रमांची रेलचेल संपूर्ण 3 महिने चालूच राहिली.
गुढी पाडव्याच्या कार्यक्रमाला आपल्या स्थानिक 'कलासन्मान' च्या गुणवंत कलाकारांनी 'शांतेचं कार्ट चालू आहे' हे पूर्वी नयनतारा, सुधीर जोशी आणि लक्ष्मीकांत बेर्डे ह्या महान कलाकारानी अजरामर केलेलं धमाल विनोदी नाटक सादर केलं. ह्या वेळेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सगळं food preparation आपल्या स्वयंसेवकांनी केलं होतं. अतिशय कमी resources वापरून ह्या स्वयंसेवकांनी आपल्या सगळ्यांना रुचकर आणि अस्सल मराठी खाद्यपदार्थांचा आस्वाद दिला. एकत्र येऊन अतिशय उत्तम दर्जाचं काम करून दाखवण्याचं हे उत्तम उदाहरण! ही food team आता दर वर्षी एका तरी event ला असाच उपक्रम करण्यासाठी उत्साहित आहे.
बृहन महाराष्ट्र मंडळ (BMM) भारतातील नामवंत कलाकारांचे कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन येत असते. ह्या वर्षी धनश्री लेले ह्यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम BMM नी सादर केला. आपण आपल्या मंडळातर्फे त्यांचा कार्यक्रम 27 एप्रिल रोजी आयोजित केला. "ज्ञानेश्वरीतील कर्मयोग" ह्या विषयावर त्या बोलल्या. 100 हून अधिक सभासदांनी ह्या कार्यक्रमाला हजेरी लावली.
South Asians ना हृदय विकारांचा धोका जास्त असतो. हे धोके टाळण्यासाठी आपण काय काय करू शकतो हे समजावून सांगणारं एक उद्बोधक सेमिनार आपण Red Sarees ह्या संस्थेच्या बरोबरीने 12 एप्रिल रोजी आयोजित केला. सिनसिनाटीतले विख्यात हृदयरोगतज्ञ् डॉ संतोष मेनन हे प्रमुख वक्ते होते.
स्वास्थ्य उपक्रमांच्या अंतर्गत आपण मे 17 ला महाराष्ट्र दिन साजरा करण्याच्या निमित्तानं 5K walk / run आयोजित केली. तसेच 22 जून रोजी International Yoga Day साजरा केला. ह्या दोन्ही उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला. 31 मे रोजी आपण Hoxworth Blood Center च्या सहकार्याने रक्तदान शिबीर आयोजित केलेआणि त्याला भरपूर प्रतिसाद मिळून 30 जणांनी रक्तदान केलं.
त्रिवेणी आता फक्त मराठी लोकांपुरतीच मर्यादित राहिली नसून आता अतिशय आत्मविश्वासाने पुढाकार घेऊन आपल्या समाजातल्या इतर संघटनांबरोबर सहकार्य वाढवीत आहे.
ह्या त्रैमासिकातला सगळ्यात उत्कंठावर्धक कार्यक्रम म्हणजे Cleveland येथे झालेला मैत्री मेळावा! North East Ohio Marathi Mandal (NEOMM) ह्यांनी हा प्रादेशिक मेळावा आयोजित केला. Ohio मधील Columbus आणि त्रिवेणीनी ह्यात भाग घेतला. तसेच Pennsylvania , Michigan , Kentucky आणि Illinois मधील काही मंडळेही सहभागी झाली. 2 दिवस कार्यक्रमांची भरपूर रेलचेल होती. ह्यात भारतातून आलेले professional artists तसेच सगळ्या मंडळातले स्थानिक कलाकारांनी भाग घेतला.

त्रिवेणी तर्फे रौद्र रसावर आधारित नृत्याविष्कार तसेच द. मा. मिरासदार ह्यांच्या कथेवर आधारित एकांकिका आपण सादर केली. तसेच आपल्यातल्या काही कलाकारांनी NEOMM च्या opening act मध्ये सुद्धा भाग घेतला. आपल्या ढोल ताशा पथकाने Cleveland चं आसमंत दणाणून सोडले. त्रिवेणी च्या सगळ्याच performances चं आयोजक आणि प्रेक्षकांकडून खूप कौतुक झालं. सगळ्याच कलाकारांनी आणि Directors , choreographers नी जवळ जवळ 6 महिने अथक परिश्रम करून सगळे performances अतिशय उच्च दर्जावर नेऊन ठेवले.
Cleveland येथे आपण सादर केलेल्या "निरोप" ह्या एकांकिकेचे खास 2 shows आपण जे मेळाव्याला येऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी सादर केले. 160 होऊन अधिक सभासदांनी हजेरी लावली.
त्रिवेणी चा ह्या मेळाव्यातील उत्साहपूर्ण आणि मोठ्या संख्येनी सहभाग हा ह्या मेळाव्याच्या यशातील एक मोठा घटक होता ही आपल्या सगळ्यांसाठीच एक फार अभिमानाची बाब आहे. त्रिवेणी ही एका मोठ्या कुटुंबासारखी घट्ट बांधलेली संस्था आहे आणि आपण सगळे एकत्र येऊन मोठी आव्हानं पेलू शकतो हा आत्मविश्वास ह्या मेळाव्याच्या निमित्तानं आला. भविष्यात आपणही अश्या large - scale events आयोजित करू शकू अशी खात्री वाटते.
जास्तीत जास्त मराठी लोकांना त्रिवेणी मध्ये सहभागी करून घेणं हा आपला नेहमीच प्रयत्न राहिला आहे. अर्धं वर्ष संपलं आहे, उर्वरित वर्षासाठी आपण सवलतीच्या दरात membership उपलब्ध करून देत आहोत. 1 जुलै नंतर आपण website वर जाऊन सभासदत्व घेऊ शकता -
नजीकच्या काळातील आगामी कार्यक्रम :
12 जुलै : Greater Cincinnati Water Works च्या Water Treatment Plant Visit .
आपल्या सगळ्यांसाठीच आणि खास करून middle आणि high - school च्या विद्यार्थ्यांसाठी ही Ohio नदीतील पाणी आपल्या घरापर्यंत कसं पोचतं हे समजून घेण्याची ही उत्तम संधी आहे -
19 जुलै : Mason Fire Department च्या सहकार्यांनी CPR / AED training
31 ऑगस्ट रोजी दर वर्षी प्रमाणे Hindu Temple येथे गणेश उत्सव साजरा होईल.
त्रिवेणी चे सगळे कार्यक्रम आणि उपक्रम हे आपल्या Executive Committee च्या पुढाकाराने आणि Advisory Committee च्या सल्ल्याने साकार होतात. आपल्यातील सर्जनशीलता, उत्साह आणि बांधिलकी ह्यांना व्यक्त करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे ह्या committees मधला सहभाग. 2026 च्या कमिटी मध्ये सहभागी होण्यासाठी आपण आता आपले अर्ज भरू शकता -


Comments