शेअर मार्केटमधून उत्पन्न – दीर्घकालीन गुंतवणुकीच्या पलीकडे एक नवा मार्ग
- नचिकेत देशमुख

- Jun 30
- 1 min read
आपल्या भारतीय संस्कृतीत, शेअर्समध्ये गुंतवणूक म्हणजे "खरेदी करून दीर्घकाळ ठेवणे" हा पारंपरिक दृष्टिकोन आहे. पण आजच्या बदलत्या आर्थिक परिस्थितीत, हा दृष्टिकोन अनेक वेळा भांडवल अडकवतो आणि return on investment अपुरा देतो. Options trading (Derivatives trading) म्हणजेच दररोज किंवा दर आठवड्याला उत्पन्न मिळवण्याचा एक मार्ग बनत आहे.
पारंपरिक गुंतवणूक विरुद्ध ट्रेंडिंग इनकम स्ट्रॅटेजीज
पारंपरिक गुंतवणुकीत आपल्याला पैसा लावावा लागतो आणि मग त्याचे returns वर्षानुवर्षं थांबून पाहावे लागतो. याउलट, options trading मध्ये अशा पद्धती आहेत ज्या वापरून दररोज किंवा दर आठवड्याला उत्पन्न मिळू शकते. या साठी दिवसातील ३० मिनिटे देखील पुरेशी आहेत. माझ्या ओळखीचे असे बरेच जण आहेत जे स्वतःची नोकरी, व्यवसाय किंवा घर सांभाळून दर आठवड्याला trading करून स्थिर उत्पन्न मिळवतात.
निर्णयांसाठी technical analysis चा वापर
बरेच लोक शेअर मार्केटकडे अजूनही "लॉटरी" किंवा अंदाजावर आधारित इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहतात. Speculation किंवा अंदाज न करता, डेटा आणि ट्रेंड्सवर आधारित ट्रेड्स घेता येतात – जे फार सुरक्षित आणि सुसंगत उत्पन्न मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
काही Options trading स्ट्रॅटेजीज:
Cash-Secured Puts – समजा एखादा शेअर $100 ला मिळतोय आणि आपण तो $90 ला विकत घ्यायला तयार आहोत. आपण $90 चा Put Option विकतो, आणि जर तो शेअर त्या दरावर आला, तर आपल्याला तो घ्यावा लागेल – पण आपण त्यासाठी आधीच premium कमावलेलं असतं. जर शेअर खालीच गेला नाही, तर फक्त premium आपल्याला मिळतो आणि शेअर घेतलाच जात नाही.
Covered Calls – समजा आपल्या जवळ 100 शेअर्स आहेत आणि आपल्याला ते विकायचे नाहीत, पण दर आठवड्याला त्यावर उत्पन्न कमवायचं आहे. आपण त्या शेअर्सवर Call Option विकतो. जर शेअर खूपच वर गेला, तर आपल्याला ते विकावे लागू शकतात, पण premium आपल्याकडे राहतो. जर शेअर तसाच राहिला, तर दर आठवड्याला उत्पन्न मिळत राहतं.
Vertical Spreads – समजा एखाद्या स्टॉकवर आपल्याला वाटतं की तो वर जाणार आहे, पण आपण खूप मोठा जोखीम घेत नाही. आपण एका strike वर Call विकतो आणि दुसऱ्या strike वर Call विकत घेतो. यात जोखीम मर्यादित असते आणि संभाव्य नफा ठरलेला असतो. ही strategy direction कळत असेल तर फार उपयुक्त ठरते.
Iron Condors – जर आपल्याला वाटतं की एखादा stock किंवा index (जसं की SPX) फारसा वरखाली जाणार नाही, तर आपण Iron Condor strategy वापरू शकतो. यात आपण एका रेंजमध्ये premium collect करतो. शेअर किंवा index त्या रेंजमध्ये राहिला, तर संपूर्ण profit आपल्याला मिळतो. ही strategy शांत बाजारासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
निष्कर्ष
आजचा काळ हा कौशल्याचा आहे. Stock आणि Options Trading ही एक अशी कौशल्यपूर्ण संधी आहे जिच्यातून आपण आपल्या आर्थिक स्वतंत्रतेकडे एक पाऊल पुढे टाकू शकतो. पारंपरिक गुंतवणुकीचा सन्मान ठेवत, नवा मार्ग स्वीकारणे हे काळाची गरज आहे.

Nachiket Deshmukh is a founder of Tradeonomics Academy LLC that provides in-person coaching on stocks and options trading. Tradeonomics is a 2025 sponsor to Triveni Mitra Mandal. You can find more information at https://www.tradeonomics.us.




Comments