top of page

रील्स व शॉर्ट्सची सफर



ree

सांगलीतील लेझीम पथक

विसावा मंडळ, सांगली हे गेली ३९ वर्षे गणेश उत्सव करत आले आहे. श्रावणी सोमवार पासून शिवोत्सव चालू होतो तो गणपतीच्या ७व्या दिवसापर्यंत इथे उत्सव चालू राहतो. ह्या उत्सवाचं वैशिष्टय म्हणजे मिरवणूकीतील लेझीम. वय वर्ष ५ ते ७० मधील स्त्री-पुरुष ह्या पथकात सामील होऊन वाद्यवादन करतात आणि लेझीम करतात. ह्या मंडळाकडे ढोल ताशा नाही. परंपरागत दरवर्षी फक्त लेझीमच केलं जातं , त्यासोबत लाठीकाठीचे खेळही सादर होतात. ह्यात किती उत्साह आहे, ते ह्या व्हिडिओ वरून कळेलच. 

लेझीम पथकात कुठलंही वयाचं बंधन नाही आणि वयाने मोठेही अगदी लहान मुलांसारखे तितक्याच ऊर्जेने लेझीम करून नाचताना दिसतात. डॉल्बीच्या मोठ्या आवाजावर विचित्र शब्दांची गाणी ऐकून नाचण्यापेक्षा हे परंपरागत जपलेलं मिरवणुकीचे स्वरूप किती छान वाटतंय!! 


ree

येवल्याची पैठणी

पैठणी साडी महाराष्ट्राचं एक सुंदर प्रतीक आणि अनेक साडीप्रिय स्त्रियांची आवडती साडी. आता पैठणी सिल्क नुसती साडी स्वरूपात न येता त्याच्या वेगवेगळ्या accessories ना पीक आलंय - ड्रेस, जॅकेट, कुर्ते, पर्स, काय वाटेल ते. पण पैठणी साडी अजूनही हवीहवीशी वाटताना खरी पैठणी ओळखायची कशी, त्यासाठी हा व्हिडिओ जरूर पाहावा. 

डुप्लिकेट पैठणीप्रमाणे कुठल्याही “हॅण्डलूम” साड्यांच्या बाबतीतही गफला होतो. हॅन्डलूम साड्या घ्यायच्या तर एकतर डायरेक्ट weaver कडूनच घ्याव्या किंवा दुकानात घ्यायची झाल्यास हॅण्डलूम सर्टिफाइड मार्क आहे, ही खात्री करून साडी विकत घ्यावी. हॅण्डलूम सिल्क साडी ही पोवारलूम साडीपेक्षा महाग असते, हे लक्षात ठेवा. कुणी स्वस्तात सिल्क हॅण्डलूम देत असेल तर ती फसवणूक आहे. शिवाय, हॅन्डलूम साडी ही अतिशय मुलायम आणि वजनाने हलकी असते. पॉवरलूम साड्या हॅण्डलूम म्हणून चुकीच्या पद्धतीने विकल्या जाणाऱ्या साड्या घेऊ नयेत.


ree

AI ची गंमत

गायिका व अभिनेत्री इला अरुण हिची मुलगी इशिता अरुण ही स्वतः खूप छान अभिनेत्री, गायिका आणि VJ आहे. तिची रिल्स फारच मस्त असतात.तिचं लग्न मराठी कुटुंबात झालेलं असलं तरी त्याआधीच ती मराठी बोलत होती. तिच्या रील्स ह्या खूप कलात्मक असतात.




ree

अभिनेत्री आणि वयोमर्यादा

एकूणच, अभिनय क्षेत्रात अनेक कलाकारांच्या बाबतीत एका ठरावीक साचेबद्ध भूमिकांमध्ये अडकणं, हे सरसकट बघायला मिळतं. लेखक व दिग्दर्शक ह्यांनी कलाकारांना त्या साच्यातून काढून दुसर्या भूमिकांमध्ये बघायची “रिस्क” घ्यायला तयार झाले तर हे सोप्पं होईल. बहूदा, ते तयार झाले तरी, त्यांच्यावर पैसे ओतणारे (producers/sponsors) आक्षेप घेत असावेत, जे क्रिएटिव प्रोसेसला नेहमीच घातक आहे. आता OTT मुळे चित्र बदलतंय खरंतर. प्रमाण कमी असलं तरी बदल होतोय. 

हे सगळं असलं तरी फेसबुक, insta, youtube असे सगळे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध असताना, एखाद्या कलाकाराने ह्या तक्रारी करुन लेखक व दिग्दर्शक ह्यांना दोष देण्यापेक्षा स्वतःच काहीतरी करुन दाखवणं व स्वतःची कला स्वतःच जगापर्यंत पोहोचणं  हे त्यामानाने सोप्पं आहे आता. 

त्यातून पैशाची कमाई कमी जास्त असेल, पण क्रिएटिव्हिटीची घुसमट कमी होऊ शकते, व संधी मिळायची शक्यता वाढू शकते.


धनलक्ष्मी कुलकर्णी
धनलक्ष्मी कुलकर्णी

Comments


bottom of page