संपादकीय
- 6 days ago
- 2 min read
Updated: 1 day ago
नमस्कार मंडळी!
त्रिवेणी संवाद आता double digits मध्ये पोचलंय - हा दहावा अंक.
2023 मध्ये ह्या संकल्पनेचा उदय झाला आणि त्या वेळच्या सल्लागार समिती च्या प्रोत्साहनामुळे हा त्रैमासिक अंक सुरु करायचं ठरलं. निवेदिता बक्षी, पूर्णिमा गलगली आणि धनलक्ष्मी कुलकर्णी उत्साहाने संपादक समितीत सामील झाल्या. नील शेट्टीगर ने मुखपृष्ठाची जबाबदारी घेतली. सुरुवातीला 'संवाद' print स्वरूपात किंवा print ready 'pdf' स्वरूपात प्रकाशित करायचे असं ठरलं. त्यासाठी अंकाचं structure, design , मुखपृष्ठ संकल्पना ह्या सगळ्याची जबाबदारी सुवृता राव-गोगवेकर हिनं घेतली. अशा प्रकारे पहिली संपादकीय समिती तयार झाली आणि ह्या वर्षाच्या सुरुवातीला अंजली गद्रे सुद्धा join झाली.
2024 च्या शेवटी त्रिवेणी ची नवी website launch झाली आणि December 2024 च्या अंकापासून संवाद आपल्या website वर blog स्वरूपात प्रसिद्ध होऊ लागला.
बृहन महाराष्ट्र मंडळ (BMM) त्यांचं मासिक पत्र 'BMM वृत्त' ह्या नावानी गेली 40 वर्षाहून अधिक काळ प्रसिद्ध करत आहे. 'संवाद' तसेच इतर मंडळांच्या लेख / लेखकांना एक national platform मिळावा ह्या दृष्टीनी त्रिवेणी तर्फे आपण 'BMM वृत्त' ला शिफारस केली आहे. BMM ह्याचा गांभीर्याने विचार करत आहे.
गेल्या त्रैमासिकाची सुरुवात 18 एप्रिल रोजी गुढी पाडवा celebration च्या निमित्ताने धूमधडाक्यात झाली. कलासन्मान तर्फे 'घेतलं शिंगावर' हे मनोहर काटदरे लिखित फार्स सादर करण्यात आले.
अमेरिकाभर अनेक संस्था नाट्यनिर्मिती करतात. सहसा प्रेक्षकांचा आणि म्हणून ह्या नाट्यनिर्मिती करणाऱ्या संस्थांचा कल विनोदी नाटकांपुरता मर्यादित असतो. दर्जेदार, विचार करायला लावणारी अशी गंभीर कलाकृती प्रेक्षकांसमोर आणायचे मोठं धाडस ह्या वर्षी कलासन्मान आणि त्रिवेणी नी केलं. प्रा. वसंत कानेटकर लिखित 'हिमालयाची सावली' हे नाटक जून 6 आणि 7 रोजी Fairfield Community Arts Center इथे सादर केलं. नाटकाला मिळालेला प्रतिसाद बघून मराठी प्रेक्षकाची क्षमता अजूनही शाबूत आहे ह्याची खात्री पटली.
ह्या वर्षीचा एक नवीन उपक्रम म्हणजे 'दिंडी' - आषाढी एकादशी आणि महाराष्ट्रातील वारीची परंपरा ह्यांची सांगड आपल्या स्वास्थ्य वृद्धिंगत करण्यासाठी च्या प्रयत्नांशी घालायची असा हा प्रयत्न. महाराष्ट्रातील विविध ठिकाणांपासून पंढरपूर पर्यंत चे अंतर target म्हणून समोर ठेवून 9 मे पासून ते 25 जुलै ह्या कालावधीत पूर्ण करायचे असा संकल्प घेऊन त्रिवेणी चे 42 वारकरी जवळ जवळ 5,800 miles चालणार आहेत.
21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला गेला.
दार वर्षी प्रमाणे ह्या ही वर्षी Hoxworth च्या सहकार्याने रक्तदानाचा कार्यक्रम आयोजिला होता. ह्या वर्षी अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आणि 40 सभासदांनी रक्तदान केले.
पुढील त्रैमासीकातील खास आकर्षण म्हणजे BMM चा Seattle इथे ऑगस्ट 6-9 दरम्यान होणारा द्विवार्षिक सोहळा! संपूर्ण अमेरिकेतून जवळ जवळ 5,000 मराठी माणसं ह्या convention ला हजेरी लावतात. महाराष्ट्रातील अनेक प्रथितयश कलाकार हजेरी लावतात.
अमेरिकेतील मराठी कलाकारांसाठी सुद्धा ही एक चांगली संधी असते. अशातलीच एक म्हणजे त्रिवेणीच्या सीमा इनामदार - "स्वरमंच" ह्या गायनाच्या स्पर्धेत सीमा इनामदार ह्या 50+ वयोगटातील स्पर्धेत finalist आहेत. Seattle इथे होणाऱ्या अंतिम फेरीत सीमा त्यांचे गायन सादर करतील. प्रसिद्ध गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी हे ह्या स्पर्धेचे परीक्षक आहेत. संपूर्ण त्रिवेणी परिवारातर्फे सीमा इनामदार ह्यांना अंतिम फेरीसाठी खूप खूप शुभेच्छा!
BMM 2026 Convention बद्दल अधिक माहिती ह्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे : https://bmmseattle2026.org/
त्रिवेणीचा पुढचा मोठा कार्यक्रम म्हणजे गणेश उत्सव - 14 सप्टेंबर रोजी दार वर्षी प्रमाणे Hindu Temple Of Greater Cincinnati इथे साजरा होईल. ढोल ताशा पथक हे ह्या दिवशीचे एक मोठेच आकर्षण असते. पथकाचे ढोल ताशा practice sessions सुरु झाले आहेत. झांझ आणि लेझीम चे practice sessions लवकरच सुरु होतील. ह्या पथकात सहभागी व्हायचे असेल तर कृपया ऋषिकेश गावड (216-855-2725) ह्यांच्याशी संपर्क साधावा.


Comments