संपादकीय
- Mar 31
- 3 min read
नमस्कार मंडळी!
त्रिवेणीच्या सर्व सभासदांना आगामी गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
2026 चा पहिला आणि आपला एकूण नववा अंक सादर करताना खूप आनंद होतोय.
या वर्षाची सुरुवात मकर संक्रांतीच्या कार्यक्रमाने झाली. जवळजवळ 80 सभासदांनी अतिशय मेहनतीने मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासावर आधारित एक सुंदर कार्यक्रम सादर केला. 330 लोकांनी हजेरी लावली, हा गेल्या काही वर्षातला विक्रम आहे.
गेल्या दोन वर्षांपासून आपण सुरू केलेला सामाजिक उपक्रमांना समर्थन देण्याचा प्रयत्न यावर्षीही सुरु ठेवला आहे. ‘आशा फाउंडेशन’ ही संस्था breast cancer awareness साठी प्रयत्न करते. BMM ने "समाजरंग" या उपक्रमांतर्गत आशा फाउंडेशन ला आर्थिक सहाय्य करण्यासाठी fundraising केले. त्रिवेणी ने सुद्धा ह्या fundraising मध्ये भाग घेतला तसेच या विषयावरील “आशा” या चित्रपटाचे प्रदर्शन केले गेले.
19 फेब्रुवारी हा शिवजयंतीचा दिवस BMM गेली काही वर्षं कथावाचन करून सादर करत आहे. संपूर्ण अमेरिका आणि कॅनडा मधून शिवप्रेमींनी सलग 20 दिवस हे कथा वाचन केले. सांगायला अभिमान वाटतो की आपल्या लहान पण उत्साही मंडळातून 7 सभासदांनी कथा वाचनात भाग घेतला - पराग कानविंदे ह्यांनी त्रिवेणीच्याच नव्हे तर इतर अनेक वाचकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या बरोबर अपर्णा काकिर्डे, कुशल अभ्यंकर, शीतल रामचंद्रे, पल्लवी कुलकर्णी, अमित गोडबोले, अंतरा पंडित ह्यांनी अभ्यास आणि जोशपूर्ण पद्धतीने शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील घटना सादर केल्या. 19 फेब्रुवारीला प्रसिद्ध संगीतकार आणि गायक कौशल इनामदार ह्यांच्या वाचनाने ह्या सोहळ्याचंही समाप्ती झाली.
Heart healthy diet म्हणजेच हृदयविकार दूर ठेवण्यासाठीचा आहार ह्या विषयावर विनिता कामत यांनी सेमिनार द्वारे अतिशय उपयुक्त माहिती सांगितली. शाकाहारी आहार सुद्धा अतिशय healthy आणि interesting कसा करता येईल हे विनिता ताईंनी अनेक उदाहरणांनी समजावून सांगितले. Red Saree Cincinnati ह्या संस्थेच्या भागीदारीने आपण हा कार्यक्रम केला.
अमेरिकेत राहून मराठी पुस्तकं वाचायला मिळणं हे थोडेसं कठीण आहे. निलज रुकडीकर यांनी पुढाकार घेऊन त्रिवेणी लायब्ररी हा उपक्रम सुरु केला आहे. भारतातून आलेल्या parents ना वेळ घालवण्यासाठी सुद्धा वाचन हे अतिशय उपयुक्त माध्यम आहे. सध्या आपल्या लायब्ररी मध्ये जवळ जवळ 120 पुस्तकं उपलब्ध आहेत. ह्यात नीला धुरंधर मावशींनी दिलेली 20 पुस्तकं ही आहेत.
महत्वाचं म्हणजे त्रिवेणीच्या सभासदांना या लायब्ररीसाठी कोणतीही फी द्यावी लागणार नाहीये.
त्रिवेणीच्या वेबसाईट वर लॉगीन केल्यावर, मोअर च्या अंडर Library नावाचा टॅब आहे (https://www.triveni-mandal.org/library), आणि तिथे एक फॉर्म आहे, तो भरला की तिथून पुढे तुम्हाला प्रोसेस समजेलच. तुम्हाला पुस्तकं किंवा आणखी पुस्तकं घेण्यासाठी काही अमाऊंट डोनेट करायची असेल तर त्रिवेणी समिती किंवा निलज रुकडीकर (650-670-6665) / पूजा पंडित (510-579-1463) यांना संपर्क करू शकता.
जास्तीत जास्त लोकांनी या सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती.
ह्या वर्षी गुढी पाडवा आणि महाराष्ट्र दिन एकत्रितपणे 18 एप्रिल रोजी साजरा करण्याचे योजले आहे. हा कार्यक्रम Kettering Middle School येथे सकाळी 11:30 ते संध्याकाळी 6 या वेळेत होईल. आपल्या स्थानिक कलासन्मान तर्फे "घेतलं शिंगावर" हा मनोहर काटदरे लिखित आणि पराग कानविंदे दिग्दर्शित फार्स सादर केला जाईल.
अधिक माहिती आणि तिकिटांसाठी - https://www.triveni-mandal.org/event-details/gudhi-padwa-2026
गेल्या दोन वर्षांपासून त्रिवेणी रचना सोसायटीसाठी (https://rachanasociety.org.in/) fundraising करत आहे. रचना सोसायटी महाराष्ट्रातील ग्रामीण मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी कार्य करते. पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागात रचना सोसायटी ६० मुलींसाठी वसतिगृहही चालवते.
सिनसिनाटीतील इतर संस्था ही रचना सोसायटीला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. Mason Rhythms हा स्थानिक music group असून, संगीत सादरीकरणांसोबतच सामाजिक कार्यासाठी केलेल्या योगदानामुळेही त्यांना प्रशंसा मिळाली आहे.
या वर्षी Mason Rhythms रचना सोसायटीसाठी निधी संकलन करण्यासाठी एक संगीत कार्यक्रम 4 एप्रिल रोजी आयोजित करत आहे. हा कार्यक्रम Association for India’s Development (AID), Cincinnati Chapter यांच्या सहकार्याने आयोजित केला आहे.
आपल्यापैकी अनेकांनी रचना सोसायटीला आधीही मदत केली आहे. आम्ही आशा करतो की त्रिवेणीचे सदस्य या उपक्रमात सहभागी होतील आणि उदारपणे देणगी देतील.
कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती आणि तिकिटे येथे उपलब्ध आहेत: Cincinnati.aidindia.org
BMM चे द्विवार्षिक संमेलन ह्या वर्षी Seattle येथे 6-9 ऑगस्ट दरम्यान होत आहे. नेहमीप्रमाणेच महाराष्ट्रातून आलेले आणि अमेरिकेतले स्थानिक उत्तमोत्तम कार्यक्रम सादर होणार आहेत. "ऑल द बेस्ट" हे iconic नाटक, विदुषी आरती अंकलीकर टिकेकर आणि पंडित रघुनंदन पणशीकर ह्यांचे गायन, मधुरा वेलणकर साटम ह्यांचा "मधुरव" हा कार्यक्रम असे अनेक आकर्षक कार्यक्रम असणार आहेत. संमेलनाची अधिक माहिती तसेच तिकिटांसाठी ह्या website आहे : बीएमएम२०२६ - BMM2026 - BMM2026 - जपूया संस्कृती, विणूया नाती
जाता जाता पुन्हा एकदा नाव वर्ष, गुढी पाडवा आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! भेटूया 18 एप्रिल ला!!


Comments