top of page

परिचय

  • TMM
  • Jun 30
  • 1 min read

ree
अस्मिता रंगनाथन

माझं नाव अस्मिता आणि नवऱ्याचं नाव रंगनाथन, आम्ही दोघेही मुंबईतच जन्मलो, वाढलो आम्ही दोघेही डॉक्टर. नोकरीसाठी काही वर्ष आधी न्यूयॉर्क, सेंट लुईस मग परत भारतात चेन्नई व त्यानंतर परत अमेरिकेत पिट्सबर्गला 2001 साली आलो. रंगनाथांना इथे जॉब लागला म्हणून जून 2020 मध्ये आम्ही पिट्सबर्ग सोडून सिनसीनाटीमध्ये आलो. मी पॅथॉलॉजिस्ट,पण मी प्रॅक्टिस करत नाही. आम्हाला एक मुलगी आहे, आणि तिचं लग्न झालंय. आम्ही सध्या Blueash मध्ये राहतो .

मी संस्कृत शिकले आणि शिकवते ही. सध्या मी साईबाबा टेम्पल मध्ये लहान मुलांना शिकवते. तसंच ऑनलाईन मोठ्यांचे क्लास पण घेते. याशिवाय बाल गोकुलम मासिकासाठी मी चित्र काढते. लहान मुलांच्या पुस्तकांमध्ये इल्लूस्ट्रेशन्स करते. मला एकूणच पेंटिंग / ड्रॉईंग करायला आवडतं.  लहान मुलांची कुठली गाणी/डान्स याच्यासाठी बॅकड्रॉप/ प्रॉप्स करायचे असतील तर मला त्याच्यात आवर्जून सहभागी व्हायला आवडेल. या व्यतिरिक्त, रामायणावर माझे एक पुस्तक पब्लिश झालंय.


इंद्राणी-जुगल वैद्य
ree

मी आणि माझी बायको इंद्राणी आमच्या दोघांचाही जन्म लातुरचा. आमचं शिक्षण तिथेच झालं मी बी कॉम सीएफए आहे मी यु एस ला न्यूजर्सी मध्ये मास्टर्स इन फायनान्स अनॅलिटीक्स करायला आलो त्यानंतर मी काही दिवस न्यूयॉर्कमध्ये जॉब करत होतो 2023 मध्ये मी सिनसीनाटीमध्ये आलो. एक वर्षापूर्वीच माझं लग्न झालंय माझी बायको इंद्राणी हिने आर्ट्स आणि मास मीडियामध्ये शिक्षण घेतलं आहे. सध्या ती घरी असते. आम्ही पिकल बॉल खेळतो, हायकिंग करतो. त्रिवेणीच्या नुकताच झालेल्या गुढीपाडव्याचा कार्यक्रमात आम्ही सहभागी झालो होतो.


अभिषेक ऐनापुरे
ree

मी 2018 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ सिनसिनाटीमध्ये मास्टर्स करायला आलो 21 मध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं त्यानंतर मी Paedetronics नावाच्या कंपनीत डेटा सायंटिस्ट म्हणून काम करू लागलो. गेल्या सहा महिन्यापूर्वी मी UTAH येथील स्टार्टअप कंपनीत रिमोटली काम करतोय.

माझा जन्म पुण्याचा आणि शिक्षण ही तिकडचं मला कुकिंगची खूप आवड आहे. मला वेगवेगळी cuisine मध्ये हेल्दी डीशेस बनवायला आवडतात. मला व्यायाम व खेळ सांभाळून स्वतःचा फिटनेस जपायला आवडतो. त्रिवेणीत सुजित उपाध्ये यांच्याशी ओळख झाल्यावर मी जानेवारीपासून मराठी शाळेमध्ये मी शिकवायला जात असे.



 


Comments


bottom of page