top of page

YouTube and A Career As A Content Creator

Youtube हा सध्या जगातील सर्वात मोठा व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. दररोज लाखो लोक यावर नवनवीन व्हिडिओ पाहतात आणि अपलोड करतात.काही लोकांसाठी Youtube हे फक्त मनोरंजनाचे साधन आहे, तर काहींसाठी हे करिअर आणि उत्पन्नाचे एक मोठे साधन बनले आहे.

मी अमेरिकेत राहणारी मराठी vlogger असून माझं " Rushitra Vlogs" हे युट्युब चॅनेल आहे. या चॅनेलवर मी माझे दैनंदिन जीवन, travel experience , अमेरिकेतील जीवनशैली आणि वेगवेगळ्या उपयुक्त माहिती वर आधारित व्हिडिओ तयार करते. मराठी प्रेक्षकांसाठी हा खास प्लॅटफॉर्म आहे. जिथे त्यांना परदेशातील जीवनशैली बद्दल माहिती मिळते.

पण youtube वर यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात .. आणि म्हणूनच मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे.

चला जाणून घेऊया!

मी माझा channel 2018 ला create केलं आणि सर्वात पहिला व्हिडिओ जेव्हा मी अपलोड केला ,त्याला पाच लाखांपेक्षा जास्त views आले होते.आणि त्यामुळे माझे subscribers पण वाढत होते. जर आपण Youtube वर करिअरचा विचार करत असू तर Youtube वर अकाउंट ओपन केल्यावर त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची स्टेप ती म्हणजे Monetization . यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात . 1000 subscribers आणि किमान बारा महिन्यात 4000 watch Hours पूर्ण असावेत .

जेव्हा माझा channel Monetize झालं तेव्हा वाटलं की आपण व्हिडिओज करूया आणि Youtube Continue करूया. लग्नानंतर अमेरिकेत आल्यावर माझ्याकडे विषयही होते ज्यावर मी व्हिडिओज बनवू शकते आणि उत्तम content लोकांसमोर मांडू शकते.

यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे Editing. मी कोविड लॉकडाऊन मध्ये एडिटिंग चे क्लासेस केले आणि व्हिडिओज वर आपण उत्तम कसं काम करू शकतो यावर भर दिला. (video editing साठी Adobe Premiere Pro , Final Cut Pro किंवा mobile साठी kinemaster, Inshot वापरु शकतो). मला आणि माझ्या नवऱ्याला नवीन गॅजेट्स (Gadgets) गोळा करण्याचा खूप छंद आहे. विशेषता;कॅमेरा, लेन्स, ड्रोन, मायक्रोफोन आणि एडिटिंग साठी आवश्यक उपकरणे यामध्ये आम्हाला खूप रस आहे. आमच्या Vlogs च्या प्रत्येक व्हिडिओला उत्तम दर्जा मिळावा यासाठी आम्ही योग्य उपकरणे वापरण्याचा प्रयत्न करतो. Vlogging हे केवळ कंटेंट तयार करण्याचे माध्यम नाही, तर एक व्हिज्युअल स्टोरीटेलिंग आर्ट आहे, आणि त्यासाठी योग्य गॅजेट्स असणे गरजेचे आहे. 

मोठमोठ्या कंपन्या आणि छोट्या व्यवसायांसाठी युट्युब हे उत्तम जाहिरात माध्यम आहे. मी एका Baby camera साठी ब्रॅण्डिंग केलं होतं. जो माझा पहिला ब्रँड होता प्रमोशनसाठी आणि व्हिडिओ मार्केटिंग द्वारे हे ब्रँड्स अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतात. ब्रँड्स सोबत भागीदारी करून तुम्ही तुमच्या चॅनलवर त्यांचे प्रॉडक्ट प्रमोट करू शकता.


युट्युब वर अधिक पैसे कसे कमवू शकता?

YouTube Partner Program (YPP):

YouTube Partner Program हा यूट्यूबवरून पैसे कमवण्याचा एक मुख्य मार्ग आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या व्हिडिओंवर अ‍ॅड्स (जाहिराती) चालवू शकता आणि यूट्यूब तुम्हाला त्या अ‍ॅड्सवरील क्लिक किंवा व्ह्यूजच्या आधारावर पैसे देतो.

सुपरचॅट, सुपरस्टिकर आणि लाइव चॅनेल कमाई:

लाइव्ह स्ट्रीमिंग मध्ये तुम्हाला प्रेक्षकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळते. यामध्ये प्रेक्षक सुपरचॅट किंवा सुपरस्टिकर खरेदी करतात आणि तुम्हाला थेट पैसे मिळतात. लाइव्ह स्ट्रीमिंग चालू असताना प्रेक्षक एक विशिष्ट रक्कम भरून आपल्या comment ला "Highlight " करू शकतात, जेणेकरून त्यांचा संदेश अधिक लोकांपर्यंत पोहचवला जातो.

ब्रँड स्पॉन्सरशिप्स आणि सहयोग :

ब्रँड्स तुमच्याशी संपर्क साधून त्यांचे उत्पादन प्रमोट करण्यासाठी स्पॉन्सरशिप ऑफर करू शकतात. यासाठी तुम्हाला ब्रँड्ससोबत चांगला संबंध आणि चांगले फॉलोइंग असणे आवश्यक आहे.

माझ्या अनुभवात, एक "शैक्षणिक अकॅडमीने" माझ्याशी संपर्क करून,मला त्यांच्या Brand Promotion करण्याची संधी दिली. मी त्यांच्या promotion साठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर त्यांची Information, लिंक, आणि स्टोरी शेअर केली . यासोबतच, त्या ब्रँडने एक डिस्काउंट कोड देखील तयार केला , ज्याद्वारे माझे प्रेक्षक त्या कोडचा वापर करून ती सेवा कमी किमतीत अनुभवू शकतात.

या प्रकारे, ब्रँड स्पॉन्सरशिप्स आणि डिस्काउंट कोड्स हे यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर पैसे कमवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणून काम करत आहेत.

YouTube Premium:

YouTube Premium membership घेतल्यावर, यूट्यूब प्रीमियम सदस्य तुमचे व्हिडिओ जाहिरातींविना पाहू शकतात. यामध्ये तुम्हाला तुमच्या व्हिडिओवरील प्रीमियम सदस्यतेच्या आधारावर पैसे मिळतात.

यूट्यूबमुळे मिळालेला एक अविस्मरणीय अनुभव :

Youtube केवळ व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म नसून तो आपल्याला एक ओळख मिळवून देण्याचे साधन आहे. माझ्यासोबत घडलेला एक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते. जो माझ्यासाठी खूप खास आणि अविस्मरणीय आहे.

मी दोन वर्षांपूर्वी माझ्या बाळासोबत प्रवास करीत होते आम्ही Frankfurt विमानतळावर उतरलो, आणि अचानक एका मुलीने जोरात आवाज दिला, मराठीच मुलगी होती. "नेत्राताई " हा आवाज ऐकून मला आश्चर्यच वाटले. ती माझ्याकडे आली आणि उत्साहाने विचारले " तुमचं YouTube channel आहे ,Rushitra vlogs ना ? मी हसून होकार दिला, तिने लगेचच selfie घेतला आणि सांगितले की ती माझे सर्व videos पाहते . तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता . ही जाणीव खूप आनंददायी आहे आणि प्रेरणादायी content तयार करण्याची ऊर्जा देऊन गेला हा अनुभव.


YouTube च्या नकारात्मक बाजू : चमकदार दुनियापलीकडील सत्य :

YouTube हे डिजिटल युगातील एक प्रभावी माध्यम असले, तरी त्याच्या काही नकारात्मक बाजू देखील आहेत. अनेक नवोदित क्रिएटर्सना वाटते की YouTube वर व्हिडिओ अपलोड केल्यास त्वरित प्रसिद्धी आणि पैसा मिळेल. मात्र, या चमकदार दुनियेमागे काही कठीण सत्य दडलेले आहे.

YouTube वर लाखो क्रिएटर्स आहेत, त्यामुळे स्पर्धा प्रचंड मोठी आहे. तुमचा कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सतत मेहनत घ्यावी लागते.

सतत नवीन ट्रेंड्स फॉलो करणे, नियमित व्हिडिओ अपलोड करणे आणि प्रेक्षकांच्या अपेक्षांची पूर्तता करणे यामुळे अनेक क्रिएटर्स बर्नआउट होतात.

YouTube वर ट्रोलिंग आणि हेट कमेंट्सचा मोठा त्रास होतो. काही लोक अनावश्यक टीका करतात, चुकीची माहिती पसरवतात किंवा हेतुपुरस्सर नेगेटिव्ह कमेंट्स करतात. त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होऊ शकतो आणि क्रिएटर्सचा आत्मविश्वास ही कमी होऊ शकतो.

सोशल मीडिया आणि यूट्यूबवर काही लोक निगेटिव्ह कंमेंट्स करतात, पण ते एक गोष्ट विसरतात – त्या स्क्रीन पलीकडील एक माणूस आहे. तो देखील एक मानवी भावना असलेला व्यक्ती आहे, ज्याला कधी दुख होतं, कधी आनंद होतो, आणि कधी निराशाही होऊ शकते.

निगेटिव्ह कंमेंट्स करणे हे नेहमीच सोपं असतं, पण ते काय दाखवते? त्या व्यक्तीचा मानसिकतेचा स्तर? की त्यांना एक अशी भावना असते की त्यांच्या शब्दांचा दुसऱ्यावर काहीही परिणाम होत नाही? ते विसरतात की तो स्क्रीन पलीकडील माणूस सुद्धा एक जिवंत, विचार करणारा व्यक्ती आहे ज्याला दुख आणि निराशा येऊ शकते.

मला एकच सांगावसा वाटतं,“तुमच्या शब्दांमध्ये शक्ती आहे, परंतु त्या शक्तीचा वापर सकारात्मकतेसाठी करा.”

YouTube हे एक मोठे व्यासपीठ आहे आणि यावरून करिअर घडवता येते, पण त्यासोबतच काही आव्हाने आणि वास्तव परिस्थिती आहेत. योग्य नियोजन, मानसिक स्थैर्य आणि गुणवत्तापूर्ण कंटेंट यावर भर दिल्यास या नकारात्मक बाजूंवर मात करता येईल.

धन्यवाद 

 
नेत्रा भोंईर
नेत्रा भोंईर

Comments


bottom of page