top of page

मौरिशस - एक रम्य ठिकाण

मौरिशस हे आफ्रिका आणि भारतीय उपखंडाच्या मध्ये स्थित असलेले एक बेट आहे. भारतीय उपखंडाची निर्मिती जशी आफ्रिका खंडातून झाली तसेच मौरिशस हे बेट सुद्धा पूर्वी आफ्रिका खंडाचा भाग होते त्यामुळे भारत आणि मौरिशस मध्ये बरेच साम्य दिसून येते. 


मौरिशस ला जाण्यासाठी जवळपास दोन महिने आधी पासून आमची तयारी चालू होती. मुंबई विमानतळाहून मौरिशस ला जाताना दोनदा विमान बदलावे लागते मुंबई ते सेंचेल्लस आणि मग पुढे सेंचेल्लस ते मौरिशस असे जावे लागते.संपूर्ण पाच तासाच्या प्रवासात भारतीय वेळेत आणि मौरिशस  च्या वेळेत दिड तासाचा फरक होता.विमानतळाकडून हॉटेल कडे प्रस्थान करताना वाटेत छोटी छोटी उसाची शेते आणि भारतीय पद्धतीची घरे दिसत होती. येथे आम्हाला बरीच हिंदू मंदिरे ही बघायला मिळाली.


आमचे हॉटेल हे बीच शेजारी असल्यामुळे सुंदर समुद्रकिनाऱ्याचे दृश्य हॉटेलच्या बाल्कनीतून बघायला मिळत होते. पहिला दिवस प्रवासाचा शीण घालवून दुसऱ्या दिवशी सकाळी न्याहारी आटोपून आम्ही मौरिशस भ्रमंती ला सुरुवात केली.दूरवर पसरलेला सागरी स्वच्छ किनारा आणि त्या भोवती पसरलेली पांढरी मऊ रेती हे येथील आकर्षण होते.हिंदी महासागराची क्षारता सागरी जीवांना फारशी अनुकुल नसल्याने येथे समुद्री जीव मासे,कासव आणि इतर जलचर दिसून येत नाहीत. 

ree

अतिशय सुंदर ,निळा,आकाशी छटा असलेला समुद्र मात्र डोळ्याचे पारणे फिटून टाकतो.पाण्याची खोली आत जास्त असल्यामुळे बीच वर आखूनदिलेल्या मर्यादेमध्ये जलक्रीडा व इतर खेळ खेळण्याची परवानगी असते. येथे समुद्रा मध्ये अजून काही छोटी बेटे व बघण्यासाराखी काही ठिकाणे आहेत त्या साठी काही सागरी बोटींची व्यवथा केलेली आहे. आम्ही बोटराइड घेऊन समुद्र सफारी चा आनंद घेतला. आत मधील बेटावर खूप सुंदर धबधबे आणि आसपास छोटी जंगले आहेत. महासागरात अगदी आत जाताना पाण्याचा रंगांधीक गडद आणि एकसुरी होत जातो. हे पाहताना मन अगदी शहारून जाते.


आपल्या बऱ्याच हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण हे येथील बीच वर झालेले दिसते जसे कि राजेश खन्ना यांच्या "सौतन " चित्रपटातील गानाचे "शायद मेरी शादी का ख्याल दिल मी आय है " हे गाणे इथे चित्रित झालेले आहे.


ree

दुसऱ्या दिवशी मौरिशस चे मुख्य शहर पोर्ट लुइस बघण्यात घालवायचे ठरले.इथला प्राचीन किल्ला हे इथले मुख्य आकर्षण बिंदू आहे. पूर्वी ह्या भागात फ्रेंच आणि पोर्तुगीज वसाहती असल्यामुळे इथे मिश्र संस्कृतीचा वारसा बघायला मिळतो.फ्रेंच,पोर्तुगी,इंग्लिश आणि हिंदी भाषा हि इथे बोलली जाते.येथील वस्तुसंग्रहालय आणि ऐतिहासिक ठिकाणे फ्रेंच पद्धतीने बांधलेली दिसतात .किल्लावर दगडी बांधकाम केलेले आढळून येते .किल्लावर त्या काळात वापरल्या गेलेल्या मिश्रधातूंच्या बुरुजी तोफा,तटबुरुज आणि तुरुंग हि दिसतात.


अगदी अठराशे दशकापासून येथे जहाजनिर्मिती आणि जहाजबांधणी चा व्यवसाय केला जातो.तसेच येथे मासेमारी आणि आधुनिक जहाज बांधणी साठी लागणारे कारखाने हि बघायला मिळतात.जहाजांचे प्रसिद्ध वस्तुसंग्रहालय हे येथील मुख्य पर्यटन बिंदू आहे.मौरिशस हा आफ्रिका खंडाचा भाग असल्यामुळे निसर्गाइतकीच येथे जैविक संपन्नता दिसून येते.विविध प्रकारचे हत्ती, वन्य प्राणी ,पक्षी, मोर,चित्ता आणि बदकाच्या जाती येथे आहेत.मौरिशस चा राष्ट्रीय पक्षी डोडो बर्ड हा बदकाच्या आकाराचा पक्षी आता नामशेष झाला आहे.पूर्वी येथे परकीय व्यापाऱ्याकडून प्राणी व पक्ष्यांची शिकार केली जायची त्यामुळे प्राण्यांच्या बऱ्याच प्रजाती आता नामशेष झाल्या आहेत.


मौरिशस च्या तिसऱ्या दिवसाचा शेवट आम्ही जाणीवपूर्वक सूर्यास्त बघूनच करायचे ठरवले.निळ्याशार

ree

सुंदर चमकणाऱ्या समुद्रात सुर्यदेवता केशरी,गुलाबी छटेत आकाशाचा निरोप घेताना मनाला मोहवून जाते लांब लांब नारळी झाडांच्या बागा किनारी सौंदर्यात आणखीन भर घालतात. अशा ह्या सुंदर सागरी किनार्याला जागतिक तापमानाचे संकट घिरट्या घालत आहे .वातावरणातील वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी एक ते दोन इंचाने वाढत आहे असे वैज्ञानिककांचे म्ह्नणने आहे.

निसर्गाची सुंदर देणगी असलेल्या बेटांचे संवर्धन करणे ही आपली मानवी जबाबदारी आहे.


||इति मौरिशस  यात्रा संपन्न||

रुचा पाटील
रुचा पाटील

Comments


bottom of page