top of page

Smyle please … एक नवीन आशा

उदय पारशिवणीकर
उदय पारशिवणीकर
उदय पारशिवणीकर हे आपल्यातील एक सर्जनशील उद्योजक आहेत. मेकॅनिकल इंजिनियर म्हणून त्यांनी आपला प्रवास सुरु केला आणि त्यानंतर ते IT क्षेत्रात वळले. आयुष्याच्या एका Y पॉईंट वर त्यांनी काही तरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला, आणि जन्म झाला Perceptive Devices आणि Smyle Mouse चा ! प्रत्येक माणूस मेहनत करून यशस्वी होण्याची धडपड करत असतो. अश्या ह्या चढाओढीच्या जीवनात आणि स्पर्धेच्या युगात दिव्यांग असलेल्या व्यक्तींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. 

उदयच्या Smyle  Mouse ने दिव्यांग व्यक्तींना आशेचा एक नवीन किरण दाखवला आहे.  

कॉम्पुटर च्या Mouse चा वापर चेहऱ्यावरच्या हावभावांनी करायचा ही Smyle Mouse मागची संकल्पना. नानाविध प्रकारचे अपंगत्व असलेल्या लोकांसाठी ह्याचा उपयोग  होतो. ज्या लोकांना शरीराच्या कुठलीही प्रकारच्या हालचाली करता येत नाही आणि बोलणंही शक्य नसतं अशा लोकांना कॉम्पुटर च्या माध्यमातून व्यक्तं व्हायला Smyle Mouse मदत करतं.  
अगदी कविता लिहिण्यासारख्या सर्जनशील क्रिया सुद्धा ह्यामुळे शक्य झाल्यात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोक व्यवसायासाठी आवश्यक असलेली कामं सुद्धा Smyle Mouse मुळे करू शकतात. स्पर्धेच्या जगात सगळ्यांना कसं समाविष्ट करून घेता येईल हा Smyle Mouse मागचा उद्देश सुरुवातीपासून राहिला आहे.
उदयचा हा प्रवास शब्दबद्ध केलाय अनिल सराफ आणि राजेश सहस्रबुद्धे ह्यांनी. संध्या पारशिवणीकर सुद्धा ह्या संवादात सामील झाल्या....

 

उदय, तुमचा बालपण ते Cincinnati पर्यंत चा प्रवास कसा होता ?

माझा जन्म पुण्यात झाला आणि बालपण मुख्यत्वे करून मुंबईत गेलं. वडील राज्य सरकारी अधिकारी आणि आई माध्यमिक (Secondary) शाळेत शिक्षिका व नंतर principal. मुंबईत बांद्रा (पूर्व) जिथे सरकारी कर्मचारी राहायचे तिथे वाढलो. मला जे आई-वडील, भाऊ-बहीण, सगळाच परिसर आणि लोकं मिळाली त्यामुळे मला मी फार भाग्यवान आहे असं वाटतं. आईला शिक्षकेचा व्यवसाय करताना त्यांना शाळेत आणि घरी किती काम करावं लागतं हे मी बघितलं आणि शिक्षकी पेशाबद्दल लहानपणापासूनच खूप आदर निर्माण झाला. 

माझं primary शिक्षण बांद्रा इथेच एका convent शाळेत झालं आणि secondary साठी मी आई ज्या शाळेत शिकवायची त्याच शाळेत गेलो. आई आणि मी एकाच शाळेत ह्याबद्दल फार गमतीशीर आठवणी आहेत. 11 वी आणि 12 वी साठी मी माझ्या 1ल्या choice असलेल्या जयहिंद college मध्ये गेलो. आई वडिलांची खूप इच्छा होती की मी medical ला जावं. 

त्या वेळेला मी आयुष्यातला पहिला मोठा independent निर्णय घेतला. 

मला हॉस्पिटल मधलं वातावरण फारसं कधी आवडलं नाही. मला Physics , Mechanics , Optics ह्या सगळ्यात खूप रस होता. Perpetual Motion Machine कसं design करता येईल असा विचार मी करत बसायचो. माझा Biology मधला interest सुद्धा शरीर कसं काम करतं ह्यात होता. मी engineering ला जायचा निर्णय घेतला. आई वडिलांना हा खूप मोठा धक्का होता पण त्यांनी माझा निर्णय स्वीकारला. 1980 साली मी engineering साठी VJTI ह्या नामांकित college मध्ये प्रवेश घेतला. Engineering च्या पहिल्या वर्षात मी माझ्या वर्गात पहिला आल्यावर त्यांना झालेला आनंद मला अजूनही आठवतोय.

Engineering कॉलेज मध्ये असताना माझ्या लक्षात आलं की माझा interest हा physics , mechanics ह्या पेक्षा problem solving मध्ये होता. Engineering च्या तिसऱ्या वर्षात माझी computers शी ओळख झाली. Computer programming म्हणजे pure problem solving असते असं वाटू लागलं. त्या वेळेला, l983 मध्ये आम्ही computer programs हे punch cards वापरून लिहायचो. आजच्या तुलनेत हे फार अवघड काम होतं पण ते करण्यात फार excitement होती. 

Engineering पूर्ण झाल्यावर मला Tata Consultancy Services ह्या top Indian computer technology कंपनीत काम करण्याचे भाग्य लाभलं.  पण bachelor’s degree च्या पुढे उच्च शिक्षण ही घेण्याची इच्छा होती.  त्या प्रमाणे मी 1986 साली Ohio University मध्ये मी Masters साठी प्रवेश घेतला आणि मला assistantship सुद्धा मिळाली.  परंतू 1987 मध्ये Lehigh University ने , जी Mechanical Engineering मध्ये एक Top university होती, research assistantship देऊन तातडीने बोलाविले. तेंव्हा मला माझ्या Ohio University मधल्या advisor बरोबर बोलायची सुद्धा संधी मिळाली नाही. हा आयुष्यातला आणखीन एक Y - point . मी Lehigh ला जायचा निर्णय घेतला. आपल्या आतला आवाज ऐकून, जे मनाला भावेल अशा अज्ञातात उडी घेण्याचा माझा स्वभाव आहे आणि त्याच प्रेरणेने मी हा निर्णय घेतला. 

मनाचं ऐकून पण त्याच वेळेला अतिशय तार्किक दृष्ट्या विचार करून असे आयुष्याचे निर्णय घेणे ही माझी सवय होती. पण मी जसा मोठा होतोय, तसं तसं मला हे जाणवायला लागले की सगळं जग तार्किक (logical) नसतं.

एखाद्या spreadsheet मध्ये माहिती किंवा data भरून त्या आधारावर आपल्या आसपासचं जग निर्णय घेत नाही. बऱ्याच वेळेला आधी निर्णय घेऊन नंतर त्याचं logical justification देण्याची प्रवृत्तीच जास्त असते.

Lehigh ला गेल्यावर 2 universities मध्ये किती फरक असतो हे जाणवलं. तिथे असलेल्या सुविधा, शिक्षणाचा दर्जा, विद्यार्थ्यांची क्षमता ह्यात खूपच फरक होता. Solving engineering problems using computers ही आता माझी passion बनली होती आणि Lehigh मध्ये मला हे खूप शिकायला मिळालं. तिथे असताना मला PhD करण्याची संधी होती - हा आयुष्यातला आणखी एक Y point. पण मला theory शिकत बसण्यापेक्षा real-life problems सोडवण्यात आता जास्त रस होता. त्या वेळेला Cincinnati मधली Structural Dynamics Research Corporation (SDRC) ही कंपनी ह्या क्षेत्रात आघाडीला होती.  ती माझी dream company होती, आणि तिथेच मला नोकरी मिळण्याचे भाग्य लाभले आणि मी तिथे काम सुरु करण्याचा निर्णय घेतला. 1989 साली मी SDRC च्या कामानिमित्त Cincinnati ला आलो आणि तेंव्हापासून इथेच आहे.

SDRC मध्ये अनेक आयुष्यभरासाठी मित्र मिळाले. Work life आणि social life पूर्णपणे वेगळे ठेवण्याच्या आजच्या काळात माझ्या मुलांना आश्चर्य वाटतं की व्यवसायातले सहकारी तुमचे मित्र कसे असू शकतात? पण तो काळ वेगळा होता आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो. ह्या मित्रांकडून मी खूप शिकलो. 

SDRC मध्ये मी 10 वर्षं होतो. ह्या दरम्यान माझा जोडीदाराचा शोध सुरु झाला. संध्या त्या वेळेला PhD करत होती. एकमेकांचे स्वभाव आणि जोडीदाराकडून अपेक्षा ह्यांचा अंदाज आल्यावर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. 31 डिसेंबर 1992 ला आमचं लग्न झालं. लग्नानंतर साधारण 6 महिन्यात PhD संपवून संध्या अमेरिकेला येईल अशी अपेक्षा होती. पण PhD खूपच लांबत गेली. नवीन लग्न झालेल्या ह्या काळात एकमेकांचा खूपच आधार होता. 1995 मध्ये सांध्याची PhD पूर्ण झाली. 

1999 च्या सुमारास internet ची वाढ खूप जोरात सुरु होती आणि ते क्षेत्र मला आकर्षित करत होतं. Customer Relationship Management (CRM) ह्या क्षेत्रात काम करण्याऱ्या एका start-up कंपनीत मी कामाला सुरुवात केली. Floppy disc द्वारे software वापरण्याच्या त्या काळात Synchrony ही company काळाच्या फारच पुढे होती असं म्हणायला हरकत नाही. Internet चा वापर करून central servers वापरून software ग्राहकांपर्यंत पोचवायला त्यांनी सुरवात केली - आजच्या cloud computing चा हा सुरुवातीचा अवतार ! [51:04]

1999-2001 ह्या काळात मी ह्या start-up मध्ये होतो. 1996 साली मिहीर आणि 2001 साली अवि झाले. ह्या दरम्यान संध्या सुद्धा काम करायला लागली होती. 

आयुष्यात अनेक वेळा असे क्षण येतात ज्यात आपले संपूर्ण आयुष्य बदलून टाकण्याची क्षमता असते.

Synchrony मध्ये असताना मी एक conference attend केली. तिथे एका व्यक्तीशी गप्पा मारताना मी त्याला आमच्या product बद्दल थोडी माहिती दिली. त्या व्यक्तीची सुद्धा अशाच प्रकारचे product असणारी एक अतिशय लहान company होती. त्यानी मला त्याचे business card दिलं आणि interest असल्यास फोन कर असं सांगितलं. फार छोटीशी company म्हणून मी फार सिरिअसली घेतलं नाही. ती व्यक्ती म्हणजे आजच्या Salesforce चा founder Marc Benioff! 

त्या नंतर मी काही वर्षं Anthem मध्ये काही वर्ष IT Strategy आणि Enterprise Architecture ह्या kshetrat काम केलं. Synchrony मध्ये कामाचा ताण खूप होता आणि work-life balance सांभाळणं कठीण होत होतं आणि त्याचा परिणाम कुटुंबावरही होत होता. आणि नंतर Anthem सारख्या मोठ्या कंपनीतलं राजकारणही नकोसं होत होतं. तेंव्हाच आयुष्यातला आणखीन एक मोठा Y-Point आला!


स्वतःचा business सुरु करण्याची कल्पना कशी सुचली आणि तो प्रवास कसा झाला ?

2010-11 साली मोठा मुलगा, मिहीर हा त्याचे science project करत होता. त्यात तो Nintendo Wii आणि तशाच प्रकारच्या gaming consoles वर काम करत होता. त्याला कल्पना सुचली की ह्या games चे रिमोट कंट्रोल हातानी operate न करता डोक्यावर लावले तर दोन्ही हात मोकळे ठेवून खेळात येईल. 

मिहीरची कल्पना मला आवडली आणि खूप potential आहे असं मला वाटलं. भविष्यात computers एवढे सूक्ष्म होतील की ते आपल्या चेहऱ्यावर किंवा चष्म्यावर सुद्धा लावता येतील अशी कल्पना मी त्यावेळी करत होतो. त्यावरून माझा विचार सुरु झाला की ह्याच कल्पनेवर आधारित एखादा स्वतःचाच उद्योग का सुरु करू नये? कॉम्प्युटर्स शी interact करण्यासाठी डोक्याच्या हालचाली, चेहऱ्यावरचे हावभाव ह्याचा उपयोग करता येईल. ही कल्पना patent करण्याचा निर्णय घेतला. Perceptive Devices आणि Smyle Mouse चा जन्म इथेच झाला. 

पुढली 2-3 वर्ष research आणि prototype करण्यात गेली. त्यात असं लक्षात आलं की hardware products बनवणं हे interesting असलं तरीही अतिशय जिकिरीचं आणि किचकट आहे. माझा software development चा अनुभव असल्यामुळे मी मूळ कल्पना तशीच ठेवून software-based product बनवण्याचे ठरविलं. 2016 मध्ये आमचं पहिलं product (Smyle Mouse) तयार झालं. त्या काळात आम्हाला काही अवॉर्ड्स मिळाली होती, काही competitions मध्ये आमचं product निवडलं गेलं होतं. Consumer Electronics Show (CES) ह्या अतिशय नावाजलेल्या trade show मध्ये start-up साठीचे 'Technology That Changes Lives' award ही आम्हाला मिळालेलं होतं. कालांतराने 13 US patents ही मिळाले.

एखादं product किंवा idea चं commercial success हे नुसतं design किती चांगलं आहे ह्या वर नाही तर तुम्ही ते market कसं करता ह्यावर अवलंबून असतं. Engineering mindset असल्यामुळे असं वाटायचे की design एवढं चांगलं असूनही लोकं आपलं प्रॉडक्ट का विकत घेत नाहीत? पण ते असो.  एक समाधान मात्र खूप मिळालं की आपल्या प्रॉडक्ट्स चा वापरणाऱ्या लोकांवर किती परिणाम होतोय हे प्रत्यक्ष खूप जवळून बघता आलं.  Smyle Mouse चे users मनःपूर्वक आभार म्हणजे मला त्यांच्या आशिर्वादासारखेच वाटतात!


Smyle Mouse हे प्रॉडक्ट नक्की काय आहे आणि त्याचा उपयोग कुणाला होतो?

कॉम्पुटर चा वापर चेहऱ्यावरच्या हावभावांनी करायचं ही Smyle Mouse मागची संकल्पना. नानाविध प्रकारचे अपंगत्व असलेल्या लोकांसाठी ह्याचा वापर होतो. ज्या लोकांना शरीराच्या कुठलीही प्रकारच्या हालचाली करता येत नाही आणि बोलणंही शक्य नसतं अशा लोकांना कॉम्पुटर च्या माध्यमातून व्यक्तं व्हायला Smyle Mouse मदत करतं. Webcam द्वारे चेहऱ्यावरचे हावभाव टिपून Smyle Mouse त्यांचे संदेश कॉम्पुटर पर्यंत पोचविते. डोक्याच्या डाव्या - उजव्या, वर खाली हालचालींनुसार कॉम्पुटर चा pointer हलतो. कॉम्पुटर वर हवा त्या ठिकाणी pointer पोचल्यावर click करण्यासाठी चेहऱ्यावरच्या smile चा वापर केला जातो. Smile हे एक मैत्रीपूर्ण (positive) expression आहे आणि ते सहमती दर्शवितं - म्हणून smile = click !

डोक्याच्या छोट्याशा हालचाली आणि हास्य ह्यामुळे असंख्य लोकांना व्यक्त होण्याची एक वेगळीच अनुभूती शक्य झाली! अगदी कविता लिहिण्यासारख्या सर्जनशील क्रिया सुद्धा ह्यामुळे शक्य झाल्यात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोक व्यवसायासाठी आवश्यक असलेली कामं सुद्धा Smyle Mouse मुळे करू शकतात. स्पर्धेच्या जगात सगळ्यांना कसं समाविष्ट करून घेता येईल हा Smyle Mouse मागचा माझा उद्देश सुरुवातीपासून राहिला आहे. 

Smyle Mouse चा वापर करणारे जेंव्हा आम्हाला लिहून कळवितात की "माझे जीवन एका दिवसात अपघातामुळे उध्वस्त झाले आणि शरीराचा मानेखालचा भाग निरुपोयोगी झाला पण Smyle Mouse मुळे मी आज परत एकदा कॉम्पुटर वापरू शकतो / शकते आणि माझी law degree पूर्ण करून जॉब करू शकलो" तेंव्हा अतिशय समाधान मिळते.

Testimonial
Testimonial

2010-2016 ह्या काळात तू तुझे product develop करत असताना ह्यापासून काही revenue नव्हता. उलट product development, patent lawyers असे खर्च होते. संध्याचे उत्पन्न हा आधार होता. ह्या परिस्थितीत तुझे ऊर्जा स्रोत काय होता? आपलं प्रयत्न सफल होईल हे conviction तुला कुठून मिळालं ?

ते सांगणं जरा कठीण आहे. पण 2 गोष्टी मला वाटतं त्यामागे असाव्यात - एक तर हे उपजतच conviction असावं की आपण स्वतःच्या हातानी काही तरी बनवावं आणि ते यशस्वी करून दाखवावं. पण दुसरं आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुटुंबाचा आणि मुख्य म्हणजे जोडीदाराचा आधार.  

अनिश्चित आयुष्यात माझं passion असलेलं काम व्यवसाय म्हणून करायला मिळणं हे माझं भाग्य आहे. माझ्यासाठी हे किती महत्वाचे आहे हे संध्याला समजलेलं होतं आणि त्यामुळे ती मला प्रोत्साहित करत राहिली.

अध्यात्म आणि आमच्या अध्यात्मिक सद्गुरू शकाताई ह्यांचा मानसिक आधार हा ही ह्या प्रवासात फार मोलाचा राहिला आहे.


व्यवसाय करताना बऱ्याच वेगवेगळ्या skillsets ची - जसं finance , marketing वगैरे गरज असते आणि मनुष्यबळ ही लागतं. तू तुझ्या व्यवसायात partners आणि employees दोन्हीही घेतले नाहीस. हे कितपत कठीण गेलं ?

फारच कठीण होतं ते. Logic , well thought business planning ह्याच्या पलीकडचं हे माझं एक खुळच होतं असं मी म्हणेन. नवीन व्यवसाय करू पाहणाऱ्यांना मी तसं न करण्याचा सल्ला देईन.  


Smyle Mouse चे ग्राहक कोण आहेत? कोणीही सामान्य ग्राहक हे उत्पादन खरेदी करू शकतो?

अपघातामुळे एका क्षणात spinal injury होऊन paralyze झालेले लोक, किंवा multiple sclerosis सारखे वर्षांनुवर्षे घेऊन शरीराचं नियंत्रण हरवून बसलेले रुग्ण, ALS चे रुग्ण. काही लोक असेही असतात ज्यांच्याकडे बघितल्यावर त्यांना काही शारीरिक व्याधी आहे असं वाटणार नाही, कदाचित ते तुमच्या बरोबर काम सुद्धा करत असतील पण त्यांना काही विशिष्ट हालचाली जसं माऊस हलवणं जमत नाही, किंवा माऊस हलवता आला तरीही त्याचं बटन दाबता येत नाही.

Smyle Mouse सॉफ्टवेअर हे आमचं मुख्य revenue generating प्रॉडक्ट आहे.

आजकाल मोठ्या संस्थांकडूनही ऑर्डर्स यायला लागल्या आहेत. आघाडीच्या वित्त संस्था, इन्शुरन्स कंपन्या आणि अगदी फेडरल गव्हर्मेंट किंवा स्टेट गव्हर्मेंट सुद्धा ऑर्डर्स देत आहेत.

आपण सगळे तोपर्यंतच निरोगी आणि सुदृढ आहोत, जो पर्यंत आपल्याला काही होत नाही. अगदी अपघात किंवा एखादा असाध्य रोग कशाला, वयोमान सुद्धा असतंच की. संधिवात होतो, मोतीबिंदू होतो, कमी ऐकू यायला लागतं, विसराळूपणा होऊ शकतो. प्रत्येकाला अशा काही ना काही परिस्थितीतून जावंच लागणार आहे, अशा लोकांना आपण काय मदत करू शकतो हा विचार व्हायला हवा.


हे software विकत घेतल्यावर ते वापरायचं कसं?

Smyle Mouse वापरणाऱ्या व्यक्तीच्या कंप्युटर मधल्या वेबकॅम चा वापर करून काम करतं. साधारणपणे सेकंदाला तीस वेळा या गतीने ते तुमच्या चेहऱ्याचे स्नॅप शॉट्स घेतं. या चित्रांचा वापर करून ते चेहऱ्यावरच्या हावभावातले बदल, भुवयांच्या हालचाली, स्मितहास्य, डोळ्यांच्या हालचाली हे सॉफ्टवेअर टिपत. 

आजकाल अनेक नवीन hardware आणि software products याच धरतीवर बाजारात येत आहेत. त्यामुळे मला स्पर्धा निर्माण होते आहे हे खरंच, पण मी 14वर्षांपूर्वी जी vision समोर ठेवली होती त्याचं एक प्रकारे validation आहे. 

AR / VR च्या तंत्रज्ञानामुळे आता कम्प्युटर हा आपल्या शरीरावरही वसू लागला आहे. नवनवीन उपकरण आपण चेहऱ्यावरही  धारण करायला लागलो आहोत. सध्याही टेक्नॉलॉजी वापरताना आपल्याला हाताच्या हालचाली करून कंन्ट्रोलरची बटणं दाबायला लागतात. माझं पुढचं ध्येय आहे की Smyle Mouse सारखी टेक्नॉलॉजी वापरून AR / VR devices ना कंट्रोल करणारी सिस्टीम निर्माण करणे. म्हणजे अशी कल्पना करा की मी गुगल ग्लास सारखं काहीतरी घातलं आहे, आणि कोणीतरी मला प्रश्न विचारला ज्याचं उत्तर मला शोधायचं आहे. मी फक्त माझी भुवई हलवून माझ्या VR device वर क्लिक करू शकेन आणि कोणालाही न कळता मला माझ्या डोळ्यासमोर हव्या त्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल. 


Perceptive चा पुढचा प्रवास कसा असेल ? एखाद्या मोट्या कंपनीने तुम्हाला acquisition साठी विचारणा केली असेलच ?

Smyle Mouse व्यतिरिक्त आमचं अजून एक प्रॉडक्ट आहे ते म्हणजे आमचे पेटंट्स. आम्ही हे पेटंट्स एकतर लायसन्स म्हणून दुसऱ्या कंपन्यांना देऊ शकतो किंवा ते विकण्याचा सुद्धा पर्याय आहे. पेटंट लायसन्स हा एक पूर्ण व्यवसाय ठरेल असं प्रॉडक्ट अजून झालं नाहीये पण त्याचा मी गंभीरपणे विचार करतो आहे. माझे काही स्पर्धक वेंचर कॅपिटल फंडिंग घेऊन या क्षेत्रात उतरत आहेत.


उद्योजक होऊ पाहणाऱ्यांसाठी आणि खास करून नवीन पिढीतल्या मुलांसाठी तुझा काय सल्ला असेल ?

Entrepreneurship फार एक्सायटिंग आहे, तुम्ही काय करता यावर तुमचं स्वतःचं नियंत्रण असतं, काम कसं व्हायला पाहिजे हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. परंतु त्याच वेळेला व्यवसायाशी निगडित सगळे निर्णय हे तुम्हालाच घ्यायचे असतात आणि अपयशाची जबाबदारी सुद्धा तुमचीच असते.तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या स्टार्ट अप्स मध्ये अपयशाचे प्रमाण खूप जास्त असतं आणि तुम्हाला त्यासाठी तयार असायला हवं. 

Patenting वर निर्भर राहणे म्हणजे फार risky असते. तुम्हाला पेटंटिंगच्या क्षेत्रात यायचं असेल तर होमवर्क फार महत्त्वाचं असतं. आपल्याला सहाजिकच असं वाटतं की आपली कल्पना फार युनिक आहे आणि हे पूर्वी कोणीच केलेलं नसणार, पण रिसर्च करायला लागल्यावर हे लक्षात येतं की अनेक जणांनी आपल्यासारख्याच उत्पादनांवर आधीच पेटंट घेऊन ठेवलेली आहेत. आज-काल Google search and AI मुळे patent सर्च जरा सोपं झालं आहे. पूर्वी ही फार महागडी प्रक्रिया होती. आणि patent सर्च वर भरपूर पैसे खर्च केल्यावर सुद्धा खात्री नसायची की आपल्याला पेटंट मिळेलच. 


Conviction असणं महत्त्वाचं, अपयशाचा सामना करण्याची तयारी आणि परिस्थितीप्रमाणे बदलण्याची वृत्ती. आपल्या निर्णयांमध्ये कुटुंबाचा सहभाग आणि त्यांची साथ ही सुद्धा खूप महत्त्वाची असते. 

मी जसा एकट्याने उद्योग उभा करून चालवायचं निर्णय घेतला तसं न करता एक टीम उभी करण हेही महत्त्वाचं. आजकाल मात्र बऱ्याच फंडिंग एजन्सी तुम्हाला पैसे देताना तुम्ही एकटे आहात की तुमच्या मागे टीम उभी आहे हेही बघतात. तुम्ही इंजिनियर असाल तर तुम्हाला मार्केटिंग मध्ये सपोर्ट करणारा पार्टनर शोधा, चांगले mentors किंवा advisors शोधा. एकापेक्षा जास्त mentors सुद्धा असायला हरकत नाही.  


हा सगळं technical आणि business चा प्रवास सुरु असताना संगीत आणि खास करून guitar चा छंद कसा जोपासलास?

संगीत माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग राहिला आहे. लहानपणी   आई वडिलांनी एक बुलबुल तरंग (banjo) आणून दिला होता आणि मी माळ्यावर बसून तो वाजवीत असे. आमच्या apartment च्या वर राहणाऱ्या एका काकांनी ते ऎकलं आणि माझ्या वडिलांना सांगितलं की हा छान वाजवितो आणि तुम्ही त्याला शिकवा. तसेच दुसरे एक शेजारी अतिशय मोठ्या आवाजात Ventures हा अल्बम लावून ठेवायचे आणि त्यात guitar खूप prominent असायचं. Guitar चा नाद तेंव्हापासून लागला. पुढे 7वी च्या scholarship परीक्षेच्या वेळेला आई - बाबांबरोबर असा करार झाला की scholarship मिळाली तर ते मला गिटार घेऊन देणार. अशा प्रकारे मला पहिली गिटार मिळाली. 


तुझ्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. आता आपल्या  मुलाखतीची वेळ संपत आली आहे. तर जाण्यापूर्वी, तू आजकालच्या नवीन पिढीला काय महत्वाचा सल्ला देशील? 

मला कोणी गुरु नव्हता. माझा तरुण मुलांना हा सल्ला राहील की स्वतःहून शिकण्यापेक्षा गुरुकडून शिकण्यात खूप फरक असतो आणि त्यामुळे  खूप फायदा होतो. (I would give this advice in pretty much all aspects of life – material or spiritual!)

तरुणांना आणखीन एक सल्ला म्हणजे छंद जोपासण्याचा. That brings much joy and stress-relief, especially in stressful situations.

संध्या : संगीताचा एक महत्वाचा परिणाम म्हणजे business life मधल्या अडचणी, चढ - उतार ह्यांचा सगळा ताण संगीताचं नुसतं नाव जरी काढलं तरी पळून जातो. संगीतात उदयाला रममाण होताना पाहून माझ्या मनावरचं दडपण सुद्धा लगेच नाहीसे होत असे. 


Reference links to Smyle Mouse:




 
राजेश सहस्रबुद्धे
राजेश सहस्रबुद्धे


Comentarios


bottom of page