सुंदर Put-In-Bay
- रुचा पाटील
- Apr 1
- 2 min read
२०२४ जून ला आम्ही ohio च्या Put-In-Bay ला भेट दिली होती. Put-In-Bay च्या उत्तरेकडील Lake Errie ह्या भव्य तळ्यावर असलेले बेट आहे.
सिनसिनाटी पासून Put-In-Bay ला जाण्यासाठी साधारण साडेतीन तास लागतात. आम्ही सकाळी नाश्ता आणि जेवण घेऊन ९ वाजेपर्यंत घराबाहेर पडलो, दुपारी १:३० वाजेपर्यंत पोहोचलो. जेवणानंतर गाडी पार्क करून जवळच असलेल्या फेरीचे तिकीट काढले. Lake Errie हा अमेरिकेच्या पाच नावाजलेल्या तलावांपैकी एक आहे. ह्या तलावाची सरासरी (average) खोली ६२ फूट आहे. अमेरिकेतल्या ५ तलावांपैकी हा सगळ्यात उथळ (shallow) तलाव आहे. ह्याच तलावातून niagara falls च्या niagara नदीचा उगम होतो.

नैसर्गिक उथळपणा असल्यामुळे ह्या तलावात पाण्याचा खळखळाट फार आहे. सतत पाण्याचा खळखळाट हे या तलावाचे वैशिष्ट्य आहे. फेरीबोट घेऊन आम्ही जवळपास २५ मिनिटात या बेटावर पोहोचलो. संपूर्ण बेट फिरून बघण्यासाठी तिथे गोल्फ कार्ट घ्यावी लागते. ती घेऊन आम्ही बेटावरच्या इतर परिसरात फिरलो. या बेटावर आत मध्ये पर्यटकांसाठी जागोजागी रिसॉर्ट्स, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स ची सोय केलेली आहे.गोल्फ कार्ट घेऊन आपण आवडेल त्या ठिकाणी जाऊन थांबू शकतो आणि वेगवेगळ्या किनारी दृष्यांचा आनंद घेऊ शकतो.
या बेटावर पोचल्यावर आमच्या यादीत असलेली 2 महत्वाची शाळे होती, पेरीज केव अँड बटरफ्लाय हाऊस आणी त्यानंतर अँटिक कार चे संग्रहालय, येथे सन १९२० पासूनच्या विंटेज मोटारी, ट्रॅक्टर्स आणि विंटेज जीप ची मॉडेल बघायला मिळतात.

ह्या बेटावरचे मला अतिशय आवडलेले एक ठिकाण म्हणजे ऐतिहासिक बोट हाऊस. बेन्सन फोर्ड असे ह्या जहाजाचे नाव असून सन 1924 मध्ये फोर्ड मोटार कंपनी ने त्या काळातील धातूच्या वाहतुकीसाठी हे बनवलेले होते. 1981 मध्ये 50 वर्ष जुन्या जहाजाचे रूपांतर बोट हाऊस मध्ये करून त्याचे नाव John Dyskra 2 ठेवणात आले. 3 जुलै 1986 मधे ह्या जहाजाचे पुढचे डेक काढून त्यामध्ये डायनिंग रूम,, पॅसेंजर लाउंज, फॅमिली रूम, किचन, मीटिंग हॉल,गराज आणि भव्य शयनगृह बनवण्यात आले. ह्या नंतर जहाजाचा मालक हेन्री फोर्ड जहाजाचा वापर समर होम सारखा करत असे. ह्या बोट हाऊस चे वैशिट्य म्हणजे बोट हाऊस च्या प्रत्येक कोपऱ्यातून तुम्ही पुट इन बे च्या पश्चिमी किनाऱ्या च्या देखाव्यांचा आस्वाद घेऊ शकता. हे देखावे खूपच अद्भुत आणि नयनरम्य वाटावे असे आहेत.

पुढचे ठिकाण म्हणजे पेरीज केव्ह. येथे तुम्ही वेगवेगळ्या जाती प्रजातींची फुलपाखरे बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला भुयारातून गुहेत प्रवेश करता येतो. अंधार टाळण्यासाठी येथे उजेडाची सोय केलेली आहे. भूगर्भातील भूकंपामुळे ह्या गुहेची निर्मिती झालेली आहे. गुहेच्या आतील वेगवेगळे खडक आणि दृशे बघण्यासारखी आहेत. रस्त्यातून जाताना येथे विविध पार्क्स, लहानमुलांसाठी खेळण्याची आणि बसण्याची सोय केलेली आहे तसेच स्टोअर्स, गिफ्ट शॉप्स आणि रिसॉर्ट्स ची पण येथे गर्दी बघायला मिळते.
पेरीज जागतिक शांतता स्मारक हा दीपस्तंभ येथे उभारण्यात आलेला असून याची उंची सुमारे 352 फिट आहे. 1800 च्या दशकात कॅनडा आणि अमेरिकेमध्ये झालेल्या युद्धामध्ये शहीद जवानांच्या स्मरणार्थ या दीपस्तंभाची उभारणी करण्यात आली होती. हा दीपस्तंभ दोन देशांमधील शांततापूर्ण मैत्री करार दर्शवतात. येथे उंचावर असलेल्या निरीक्षण विभागात पर्यटकांना बेटाचा संपूर्ण नजारा बघ्याची व्यवस्था केलेली आहे.
संपूर्ण बेटावर हिरवळ, उंच झाडी आणि बीच दृयशांचा आनंद घेता येतो. एकच खटकणारी गोष्ट म्हणजे पाण्याचा प्रवाह जलद असल्यामुळे फारशी मासेमारी होताना दिसत नाही किंवा जलचर बघायला मिळत नाहीत. गोल्फ कार्ट ने चार तास सफर केल्या नंतर संध्याकाळी आम्ही फेरीने घराकडे परतीच्या प्रवासाला निघालो.
।।।इति Put-In-Bay यात्रा संपन्न।।

Comments