top of page

संपादकीय

नमस्कार मंडळी,

आपल्या समस्त त्रिवेणी परिवाराला येत्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 2025 आपल्या सगळ्यांना सुख, समाधान, आरोग्य, समृद्धी आणि सुरक्षित ठरो ही सदिच्छा! 

संवाद चा हा चौथा आणि 2024 चा शेवटचा अंक. 

2024 हे वर्ष त्रिवेणीच्या दृष्टीने काही बाबतीत वेगळं ठरलं. आपल्या परंपरेनी चालत आलेल्या लोकप्रिय कार्यक्रमांच्या जोडीनं आपण ह्या वर्षी काही नवीन उपक्रम सुरु केले आणि त्याच बरोबर आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमात थोडे बदल करून काही प्रयोग ही केले. ह्या सगळ्याला तुमचा सगळ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. 

संक्रांत, गुढीपाडवा, गणेशोत्सव आणि दिवाळी हे सण नेहमीच्याच उत्साहाने आणि सांस्कृतिक कार्यक्रम करून साजरे झाले. ही सांस्कृतिक कार्यक्रम त्रिवेणीतल्या लहान-थोर सभासदांना कला प्रदर्शनाची एक मुक्त संधी असते. 

आपली मराठी शाळा यावर्षी सुद्धा सप्टेंबर महिन्यात जोमाने सुरू झाली. या वर्षी विद्यार्थ्यांची संख्या मागच्या वर्षीपेक्षा जवळ - जवळ दुप्पट झाली आहे. या वर्षी आपली शाळा BMM ने निर्धारित केलेला अभ्यासक्रम वापरणार आहे. हा अभ्यासक्रम BMM आणि पुण्यातील भारती विद्यापीठ ह्यांनी एकत्र येऊन तयार केला आहे. वर्षाच्या शेवटी आपल्या विद्यार्थ्यांना BMM-BV सर्टिफिकेट्स दिली जातील. ह्याचा फायदा त्यांना college credits साठी सुद्धा होऊ शकेल. 

आपण दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मंदिरात पूजा आणि प्रसाद आयोजित करतो. ह्या वर्षी संक्रांतीचे हळदी - कुंकू, कन्यका पूजन ह्या सारख्या प्रसंगौपाचारिक परंपरा साजऱ्या करण्यात आल्या. मंगळागौर श्रावणसरी हा महिलांसाठी exclusive असा अनोखा कार्यक्रम सुद्धा ह्या वर्षी झाला. त्याच बरोबर सुरेल संगीताचा स्वरसंध्या हा कार्यक्रम कोजागिरीनिमित्त करण्यात आला. तसेच ह्या वर्षी पिकनिक च्या ऐवजी Greater Cincinnati Water Works च्या Water Treatment Plant ला आपण भेट दिली. कार्यक्रमातले हे बदल आपल्याला आवडले असतील अशी अशा करतो. 

ह्या वर्षीच्या कमिटीने 3 मोठे उपक्रम हाती घेतले - 1. संवाद त्रैमासिक, 2. Website modernization आणि 3. रचना सोसायटीच्या मदतीसाठी fundraiser . 

Website चे नूतनीकरण हे अतिशय गरजेचे झालेले होते. पुण्यातील एका खाजगी संस्थेच्या मदतीने आपण हे काम ह्या वर्षी पूर्ण केलं. संवाद चा ह्या त्रैमासिकाचा अंक आपल्याला नवीन website द्वारे blog च्या स्वरूपात सादर करताना खूप आनंद होतो आहे. Website द्वारे संवाद हा प्रयत्न जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल अशी अशा आहे.

काही तांत्रिक कारणांमुळे आपले जुने facebook page वापरता येत नाही आहे. 2024 च्या कमिटीने नवीन facebook page वापरायला सुरवात केली. Facebook वर असलेल्या सर्व सभासदांना विनंती आहे की त्यांनी नवीन page follow करावे

आपली Instagram आणि X (twitter) accounts सुद्धा activate झाली आहेत आणि आपण ती follow करू शकता 

2025 च्या कमिटीने उत्साहात काम सुरु केलं आहे. 2024 चे चांगले आणि यशस्वी उपक्रम पुढे सुरु ठेऊन आणखीनही काही नवीन कल्पनांचा ही कमिटी विचार करत आहे. सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजनाबरोबरच अमेरिका आणि महाराष्ट्राशी सामाजिक बांधिलकी कशी जोपासता आणि वाढवता येईल हा विचार ह्या मागे असणार आहे. 2024 कार्यकारिणीच्या काही सभासदांनी काही उपक्रम पुढील वर्षी सुद्धा lead करण्याचं ठरविलं आहे. आपल्या सभासदांची त्रिवेणीच्या उपक्रमांमध्ये कार्यकारिणीवर नसताना सुद्धा योगदान देण्याची चांगली परंपरा अशीच पुढे चालू राहिली तर आपल्याला खूप काही साध्य करता येईल.

आपल्याला त्रिवेणीच्या 2024 या वर्षा बद्दल काय वाटतं ते आम्हाला वेबसाईट द्वारे जरूर कळवा - https://www.triveni-mandal.org/contact

पुन्हा एकदा, आपण सगळयांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा ! आपला संक्रांतीचा कार्यक्रम 1 फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे, तेंव्हा लवकरच भेटू!


 
राजेश सहस्रबुद्धे


Comments


bottom of page