top of page

माझ्यातला वृक्ष ...!

7 days ago
1 min read

मी वृक्ष झालो होतो, मी वृक्ष झालो होतो

थकली पावले तरी उभं राहणं टाळत नव्हतो

मी वृक्ष झालो होतो, मी वृक्ष झालो होतो

 

सावली बनून होतो, सावली वाटत होतो

तापलेल्या अस्मानी, तुकडा सावलीच शोधत होतो

मी वृक्ष झालो होतो, मी वृक्ष झालो होतो

 

कैक पचवली वादळे, झेलले हसत वार किती ?

एक वारा घाली शिळ कानी म्हणून मी रुक्ष झालो नव्हतो

मी वृक्ष झालो होतो, मी वृक्ष झालो होतो

 

किती आले? किती गेले? मोजत मी नव्हतो

हिरवी पालवी साथीला अन पिवळ्याचा निरोप घेत होतो

मी वृक्ष झालो होतो, मी वृक्ष झालो होतो

 

कधी एका चुलीसाठी तर कधी कुण्या होळीसाठी

कधी कुठल्या चितेसाठी, सरपणच तर बनत होतो

मी वृक्ष झालो होतो, मी वृक्ष झालो होतो




सचिन सोनटक्के
सचिन सोनटक्के


Comments


bottom of page