top of page

फ्लॉवरचे लोणचे


साहित्य :

  • 2 कप ताज्या फ्लॉवर च्या बारीक फोडी. (bite-size pieces) 

  • 1 कप गाजराचे छोटे काप. (1 medium carrot peeled and quartered lengthwise and cut into 1/2inch pieces)

  • 1 कप ताजी क्रॅनबेरी. (when available, do not use फ्रोझन,  roughly chopped) 

  • 1/2 कप लोणच्याचा मसाला. (Nirav or Laxmi Brand)

  • 4 टीस्पून्स मीठ.

  • 1/4 कप लिंबाचा रस.

  • 1/4 टीस्पून काळ्या मोहोरीची पावडर. (finely ground black mustard seeds [25 gms])

  • 1/2 कप पाणी.


 फोडणी चे साहित्य :

  • 1/2 कप शेंगदाणा किंवा व्हेजिटेबल तेल.

  • 2 टीस्पून काळी मोहोरी.

  • 2 टीस्पून हिंग.

  • 2 टीस्पून हळद.

 

कृती:

सर्वात आधी 1/2 कप पाण्या मध्ये 1/4 चमचा मोहोरी पावडर घालून ढवळून घ्या. आता हे मिश्रण बाजूला ठेवा.


वरील दिलेले फोडणीचे साहित्य वापरून तेल आणि मसाल्यांनी फोडणी करून घ्या. आता हे मिश्रण थोडा वेळ थंड होऊ दे, साधारण रूम टेम्परेचरला.


यानंतर एका मोठ्या भांड्यामधे एक एक करून, ताज्या फ्लॉवरच्या फोडी, गाजराचे काप, क्रॅनबेरी, लोणच्याचा मसाला, लिंबाचारस, मीठ (स्वादानुसार) आणि मोहोरी पावडरचे मिश्रण घालून या सर्व गोष्टी एकजीव करून घ्या.


*तुम्हाला जर नुसते क्रॅनबेरीचे लोणचे करावयाचे असल्यास वरील प्रमाणे समान पद्धतीचा वापर करणे केवळ लिंबू रस वगळणे.

*जर ताजी क्रॅनबेरी बाजारात उपलब्ध नसतील तर त्या बदल्यात गाजर आणि फ्लॉवर च्या प्रमाणात वाढ करावी

 

हे लोणचे मी त्रिवेणी मंडळाच्या कन्यका पूजन कार्यक्रमाच्या दिवशी मंदिरात बनवले होते आणि सर्वांना चव फार आवडली. तरी आपणा सर्वांसाठी ही खास चटकदार रेसिपी! नक्की करून बघा.


 
शोभा काळे


Comments


bottom of page