Header

Member Access Area

Log in

Login to your Triveni account

Username *
Password *
Remember Me

 

गीत-गीता

 

(एक अभिनव आणि अनुपम कार्यक्रम काव्य, संगीत व प्रबोधनासह)

आपला सर्वांचा आवडता ग्रंथ 'गीता'. त्यावरची कवी नारायण दातार यांना स्फुरलेली अत्यंत सुंदर आणि अर्थवाही गीते म्हणजे 'गीत -गीता 'यांना अप्रतिम  संगीताचं अधिष्ठान दिलं गेलं आहे आणि सादर करीत आहेत

शिकागो सिनसिनाटीचे प्रसिद्ध कलाकार :

 

                गायन पेटी : विकास फळणीकर

गायन : अजय पोंक्षे

तबला : श्याम काणे

 

स्वामी माधवानंदांच्या विवरणासह

 

गीता प्रसंग , कर्मयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग या विषयांवरील गीतांचे सुश्राव्य गायन आणि स्वामींचे उद्बोधन यांचा  योग येत आहे

 

Date – Saturday, May 14th 2016                          

Time :- 4 pm to 6:30 pm

Refreshments :- 3:45 pm to 4:00

Address – Hotel Atrium,30 Tri County Pkwy, Cincinnati, OH 45246

 

प्रवेश  विनामूल्यअधिक माहितीसाठी संपर्क

डॉ  अनुराधा कुलकर्णी  -फोन  513-460-7792

शांतला /प्रवीण  गंगातीरकर -516-633-7071/ 516-567-0894

आपली अमूल्य उपस्थिती प्रार्थनीय आहे .

 

 

     स्वामी माधवानंद अल्प परिचय:

 

स्वामी माधवानंद (डॉ.माधव नगरकर) नाथ संप्रदायाच्या आदिनाथांपासून ज्ञानेश्वर महाराज व पुढे 

स्वामी स्वरूपानंद व स्वामी माधवनाथ यांपर्यंत चालत आलेल्या ध्यानयोग प्रधान शाखेचे एक 

उत्तराधिकारी आहेतभगवद्गीता व ज्ञानेश्वरी मधील श्लोकांचे व ओव्यांचे सूक्ष्म विवरण करून 

त्यांतील अलौकिक असे दृष्टांत त्याच्या अध्यात्माच्या उंचीसह साधकांना उलगडून दाखविणे हे 

त्यांचे खास वैशिष्ट्य आहे शास्त्रीय संशोधन क्षेत्रात दोन तपे काम केल्यामुळे लाभलेल्या 

शास्त्रीदृष्टिकोनामुळे  त्यांचे विवेचन आधुनिक पिढीला रुचणारे असते. स्वामींच्या प्रबोधनाचा

लाभ ही सिनसिनाटीतल्या मराठी भाषिकांसाठी सुवर्णसंधीच आहे. ध्यान योगाचे विशेष

विवेचन - मार्गदर्शन, युवाकेंद्रे व युवाशिबिरे घेणे आणि साहित्यनिर्मिती हे त्यांचे कार्य

"स्वरूपयोग प्रतिष्ठान" या संस्थेद्वारा चालविले जात आहे. अध्यात्मावर सर्वांचाच अधिकार आहेत्यामुळे कार्यक्रम विनामूल्य आहे. तथापि ,इच्छुकांनी देणगीच्या माध्यमातूनही स्वरूपयोग प्रतिष्ठानच्या कार्यास हातभार लावावा ,असे आवाहन आहेदेणगी रोख रक्कम अथवा चेक ने देता  येईल.कृपया  चेक "आर्य धर्म समाज "या  नावाने  लिहावा कार्यक्रम स्थळी स्वामी माधवानंद लिखित ग्रंथ तसेच इतर साहित्य  उपलब्ध  असेल. इच्छुकांनी अवश्य लाभ घ्यावा .या व्यतिरिक्त रविवारी सकाळी डॉ विनायक अनुराधा कुलकर्णी यांचे निवासस्थानी ध्यान पूर्व प्रक्रिया विवरण  ध्यानाचा  कार्यक्रम होईल . अधिक माहितीसाठी डॉ  अनुराधा कुलकर्णी/ शांतला गंगातीरकर यांच्याशी संपर्क साधावा .

 

 

 

Sincerely,

2016 Social Committee

Neha Shettigar and Ketaki Sontakke

 

2016 Sports Committee

Salil Pradhan

 

2016 Karyakarini

Santosh Dalal, Aparna Gadgil, Sudheendra Galgali, Pravin Gangatirkar, Seema Inamdar, Ashish Narvekar, Sunayana Ponkshe, Anuradha Ratnaparkhi, Naresh Shettigar and Nayana Sahasrabudhe

 

P.S.  Keep in touch and stay connected for latest updates - Join/Like Triveni-Mandal-Ohio on Facebook and bookmark our website www.triveni-mandal.org  
 

 

 
Donation to TMM

Community Services
Triveni in action